शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

सोलापूर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ला गती; पुन्हा ‘नंबर १’ होण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:22 PM

प्रशासकीय मंजुरीच्या बाबतीत सोलापूर जिल्हा अव्वलस्थानी असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला

ठळक मुद्देदहा दिवसात २७ टक्क्यांवरून ७७ टक्क्यांवर पोहोचलेजलयुक्त शिवार अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे

सोलापूर : जलयुक्त शिवार अभियानामध्ये जिल्ह्याची पुन्हा घोडदौड सुरु झाली आहे. मागील काही दिवसांत तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरीमध्ये मागे दिसत असलेला जिल्हा आता राज्यात अव्वलस्थानी येण्याचा प्रयत्न करीत आहे. १३ मार्चअखेर जिल्ह्यातील ७७ टक्के कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यवतमाळनंतर राज्यात सर्वाधिक कामे सोलापूर जिल्ह्यातच होणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय मंजुरीच्या बाबतीत सोलापूर जिल्हा अव्वलस्थानी असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. 

जलयुक्त शिवार अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. २०१९ पर्यंत महाराष्ट्राला पाणीटंचाईमुक्त करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जिल्ह्यात यावर्षी २६५ गावांत १४ हजार ३०३ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यासाठी २१३ कोटी खर्चाचे नियोजनही करण्यात आले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळमध्ये सर्वाधिक १८ हजार ९३८ कामे प्रस्तावित आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात १४ हजार ३०३ कामे प्रस्तावित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात केवळ १६४७ कामे प्रस्तावित आहेत. या सर्व कामांना मंजुरी दिल्याने कामांच्या बाबतीत हा जिल्हा पहिल्या क्रमाकांवर आहे. 

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्चअखेर ९२३८ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मागील आठवड्यात शेवटून दुसºया क्रमांकावर दिसणारा हा जिल्हा आता अव्वल क्रमांकावर दिसत आहे. लोकसहभागातील कामे पूर्ण करणाºया गावांना यंदा प्राधान्य देण्यात येणार आहे. जी गावे लोकसहभागातील कामे तत्काळ सुरु करणार नाहीत, अशा गावांना शासकीय निधी मिळण्यातही अडचण होणार आहे. 

झेडपी आणि जलसंधारणाची ७१ कामे रद्द- जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग आणि जलसंधारण विभागाकडील कामांबाबत सतर्क राहण्याचे आदेश सचिवस्तरावरुन देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या विभागांची तांत्रिक निकषात न बसणारी ७१ कामे रद्द केली आहेत. पुढील काळातही आणखी कामे रद्द होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामांचे आराखडे तयार करण्याऐवजी कार्यालयात बसून आराखडे केल्याचा हा परिणाम असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागातील ह्यगोलमालह्ण कारभारामुळे मागील वर्षी ७ कोटी रुपये परत गेले होते. यावर्षीही असाच फटका बसणार असल्याची चिन्हे आहेत. 

आकड्यांचा खेळ आम्ही सुधारला : बिराजदार - राज्यातील ३४ जिल्ह्यांत सुरु असलेल्या कामांची स्थिती आठवड्यातून दोन वेळा मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांना गुगल शीटमध्ये सादर केली जाते. या शीटमध्ये गावांची संख्या, प्रस्तावित कामांची संख्या, प्रशासकीय मंजुरी दिलेल्या कामांची संख्या यांची माहिती असते. या शीटच्या आधारे मार्चच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर जिल्हा प्रशासकीय मंजुरीच्या बाबतीत शेवटून दुसºया क्रमाकांवर असल्याचे दिसत होते.

याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार म्हणाले, आकड्यांचा खेळ आणि प्रत्यक्षात सुरु असलेली कामे यात खूप फरक आहे. यावर्षी शासनाने तांत्रिक निकषावरच कामे करण्यास सांगितले. त्यानुसार आराखड्यात अनेकदा बदल करावे लागतील. 

कागदावरची कामे आणि प्रत्यक्षात होत असलेली कामे यातील फरक निश्चितपणे पाहायला हवा. यंदा आम्ही १५०० पेक्षा जास्त कामे पूर्ण केली आहेत. केवळ बांधकामे करण्याऐवजी तांत्रिक निकषावरच सर्व कामे होतील, याची दक्षता घेत आहोत. मागील दोन वर्षांप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात चांगली कामे होतील. आपण निश्चितपणे अव्वलस्थानी राहू. - डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेतीJalyukt Shivarजलयुक्त शिवार