सोलापूर जिल्हा आरोग्य कार्यालयातील अधिकाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:08 IST2020-06-19T15:07:57+5:302020-06-19T15:08:52+5:30

उत्तर-दक्षिण, अक्कलकोट, मोहोळ, बार्शी तालुक्यात आढळले रुग्ण

Solapur District Health Officer's report positive | सोलापूर जिल्हा आरोग्य कार्यालयातील अधिकाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह

सोलापूर जिल्हा आरोग्य कार्यालयातील अधिकाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह

ठळक मुद्दे जिल्हा आरोग्य कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सांभाळणाºया एका अधिकाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह शुक्रवारी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आल्याने इतर कर्मचारी सतर्क झालेअधिकाºयाच्या संपर्कातील कर्मचाºयांचा शोध घेण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य कार्यालयातर्फे सांगण्यात आले

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य कार्यालयातील प्रशासनाच्या कार्यालयातील एका अधिकाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

 सिव्हिलच्या प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य कार्यालयाकडे विविध तालुक्यातील अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले आहेत़ यामध्ये दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी तालुक्यातील रुग्णांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले़.

 जिल्हा आरोग्य कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सांभाळणाºया एका अधिकाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच शुक्रवारी जिल्हा आरोग्य कार्यालयात खळबळ उडाली़ त्या अधिकाºयाला दोन दिवसांपासून त्रास होता, त्यामुळे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते़ आज शुक्रवारी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आल्याने इतर कर्मचारी सतर्क झाले आहेत़ अधिकाºयाच्या संपर्कातील कर्मचाºयांचा शोध घेण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Solapur District Health Officer's report positive