सोलापूर जिल्हा बँकेच्या प्रशासकीय मंडळाला जूनपर्यंत मुदतवाढ, सहकारमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 14:49 IST2022-12-08T14:47:41+5:302022-12-08T14:49:06+5:30
३० मे २०१८ रोजी तत्कालीन सहकार मंञी सुभाष देशमुख यांनी बॅकेची आर्थिक घडी विस्कटल्याने बॅकेचे संचालक बरखास्त आले होते.

सोलापूर जिल्हा बँकेच्या प्रशासकीय मंडळाला जूनपर्यंत मुदतवाढ, सहकारमंत्र्यांचे आदेश
आप्पासाहेब पाटील
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकीय मंडळाला येत्या जूूनपर्यंत ( सहा महिन्यासाठी) मुदतवाढ देण्यात आली आहे. बार्शाचे आमदार राजेंद्र यांच्या पञावरुन सहकार मंत्री अतुल सावे यांनी हे आदेश काढले आहेत.
३० मे २०१८ रोजी तत्कालीन सहकार मंञी सुभाष देशमुख यांनी बॅकेची आर्थिक घडी विस्कटल्याने बॅकेचे संचालक बरखास्त आले होते. मागील चार वर्षांत डीसीसी बॅकेचा कारभार बर्यापैकी सावरला आहे. असे असताना बँकेवरील एक सदस्यीय प्रशासक हटवून दौघांचे प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. त्याचीही मुदत २ डिसेंबर रोजी संपली होती.
दरम्यान बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बँकेची आर्थिक स्थिती आणखीन सुधारलेली नाही त्यामुळे प्रशासकीय मंडळाचा कालावधी वाढविण्याची मागणी आमदार राऊत यांनी सहकार मंञी अतुल सावे यांच्याकडे केली होती. त्यानुसार सहकार मंञी सावे यांनी डीसीसी प्रशासकीय मंडळाला ६ महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.