Solapur: गळफासानंतर कुजलेल्या आवस्थेत मिळला भेळ विक्रेत्याचा मृतदेह
By रूपेश हेळवे | Updated: May 7, 2023 15:40 IST2023-05-07T15:40:28+5:302023-05-07T15:40:54+5:30
Solapur: होटगी गावातील रेल्वे लाईन परिसरात असणार्या एका खोलीत एका ५१ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

Solapur: गळफासानंतर कुजलेल्या आवस्थेत मिळला भेळ विक्रेत्याचा मृतदेह
- रूपेश हेळवे
सोलापूर : होटगी गावातील रेल्वे लाईन परिसरात असणार्या एका खोलीत एका ५१ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. परिसरात सुटलेल्या दुर्गंधीमुळे ही घटना उघडकीस आली. दरम्यान, त्याच्या शरीरावर अळ्या पडल्या होत्या. सलीम महिबूब नदाफ ( वय ५१, रा. न्यू आरबीआय कॉलनी) असे त्या मृताचे नाव आहे.
मृत सलीम हे रेल्वे स्टेशन परिसरात भेळ विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांनी काही दिवसापूर्वी होटगी येथील बंद असलेल्या रेल्वे कॉलनीमध्ये एका घरात ओढणीच्या सहाय्याने खिडकीला गळफास घेतला. तेथील नागरिकांना दोन दिवसापासून घाण वास येत होता. यामुळे नागरिकांनी याची माहिती रविवारी पोलिसांना दिली. दरम्यान, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे बहिर्जे यांनी घटनास्थळी जाऊन पाहिल्यानंतर त्यांना सलीम हा गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळला. यामुळे रुग्णसेवक लादेनच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. दरम्यान, त्याला दोन पत्नी व मुले असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.