Solapur: जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मंगळवेढयाच्या तरुणांची सायकल स्वारी
By दिपक दुपारगुडे | Updated: October 11, 2023 13:20 IST2023-10-11T13:20:07+5:302023-10-11T13:20:15+5:30
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या सभेसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष,वारी परिवाराचे सदस्य प्रा.विनायक कलुबर्मे व सिद्धेश्वर डोंगरे सायकल वरती ३०० किलोमीटर प्रवास करत सभा ठिकाणी जाणार आहेत

Solapur: जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मंगळवेढयाच्या तरुणांची सायकल स्वारी
- दीपक दुपारगुडे
सोलापूर : मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या सभेसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष,वारी परिवाराचे सदस्य प्रा.विनायक कलुबर्मे व सिद्धेश्वर डोंगरे सायकल वरती ३०० किलोमीटर प्रवास करत सभा ठिकाणी जाणार आहेत सर्वसाधारणपणे दररोज शंभर किमी प्रवास ते करणार आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगे-पाटील आणि असंख्य समाज बांधवांची मागणी आहे.
या मागणीसाठीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात महासभेचे आयोजन केलेले आहे महाराष्ट्रातून विविध भागातून मराठा बांधव या सभेसाठी लाखोंच्या संख्येने येणार आहेत मंगळवेढ्यातील या दोन युवकांनी सायकल वरती ३०० किमी प्रवास करून त्या सभेसाठी पाठिंबा दर्शवणार आहेत. याचा हा हटके सायकल प्रवास लोकांना चांगलाच भावाला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेक तरुण त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.