Solapur Crime News in Marathi: मागील काही दिवसांपासून शहरात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सोमवारी एकाच दिवशी आत्महत्या केल्याच्या चार घटना घडल्या. यात तीन तरुणांसह एका वृद्धाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले, तर एक व्यक्ती पाण्यात तरंगताना आढळली. मृत चौघांचे आत्महत्येचे कारणांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
भारतीय चौकात परिसरातील सोमवार पेठेत राहणारे सुधीर विश्वनाथ शेंडगे (वय ६९, रा. सोमवार पेठ) हे असे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह घरातील बेडरूममधील छताच्या हुकाला सुती दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती जेलरोड पोलिसांना मिळताच हवालदार बी. एस. म्हस्के यांनी घटनास्थळी पोहोचून त्यांचा मृतदेह खाली उतरून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.
लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घरकुल भागातील प्रियदर्शनी नगरात उघडकीस आली. मोहन अंबादास कारमपुरी (वय २६, रा. प्रियदर्शनी नगर, जुना विडी घरकुल) असे मृताचे नाव आहे. त्याचा मृतदेह घरातील छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आला. त्यास नातेवाइकांच्या मदतीने फासातून सोडवून एमआयडीसी पोलिस ठाण्याचे हवालदार अमोल कटके यांनी येथील शासकीय रुग्णालयात सकाळी दहा वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घरासमोरील झाडाला घेतला गळफास
राघवेंद्र नगरात सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास उघडकीस आली. वाहन चालक असलेल्या विजय सुनील गुंजोटे (वय २९, रा. राघवेंद्र नगर, जुना विडी घरकुल) असे मृताचे नाव आहे. विजय हा घरासमोरील झाडाला दोरीच्या साहाय्याने त्याने गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला. ही खबर एमआयडीसी पोलिसांना समजली असता घटनास्थळी पोलिस हवालदार समीर मुजावर यांनी पोहोचून मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात दुपारी तीन वाजता दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
साडीचा फास, आयुष्य संपवले
कुमठा नाका परिसरातील तक्षशीला नगरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. गणेश मोहन कुडके (वय १८) या युवकाने राहत्या घरात दरवाजाच्या वाशाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. या घटनेची माहिती कळताच सदर बाझार पोलिस ठाण्याचे रफीक इनामदार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाइकांच्या मदतीने गणेशला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेच्या वेळी घरात कोणीच नसल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
Web Summary : Solapur witnessed a tragic day with four suicides. Three young men and an elderly man hanged themselves, while another was found drowned. Police are investigating the causes.
Web Summary : सोलापुर में एक दुखद दिन, चार आत्महत्याएँ हुईं। तीन युवकों और एक बुजुर्ग ने फांसी लगाई, जबकि एक अन्य डूब गया। पुलिस कारणों की जांच कर रही है।