शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

जानेवारीत ८३ टक्के खटल्यात सोलापूर शहर पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 1:42 PM

विलास जळकोटकर ।  सोलापूर : वाढणारा क्राईमचा रेट आणि न्यायालयांमध्ये दाखल होणाºया दाव्यांची संख्याही वाढते आहे. नवीन वर्षातल्या जानेवारी ...

ठळक मुद्देआरोपींना शिक्षा व्हावी म्हणून स्वतंत्र कक्षदोषारोपपत्र पाठविण्याचे प्रमाणही वाढलेभक्कम पुरावे दिल्यामुळे गती वाढली

विलास जळकोटकर । सोलापूर: वाढणारा क्राईमचा रेट आणि न्यायालयांमध्ये दाखल होणाºया दाव्यांची संख्याही वाढते आहे. नवीन वर्षातल्या जानेवारी महिन्यामध्ये सोलापूरच्या जेएमएफसी (प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी) आणि सेशन (सत्र न्यायालय) मध्ये शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून ३१७ खटले दाखल झाले. यापैकी २६२ खटल्यातील आरोपींना शिक्षा झाली. एका महिन्याचे हे प्रमाण ८३ टक्के असल्याचे समोर आले आहे. गतवर्षीॅ संपूर्ण वर्षातचे हे प्रमाण ५३.४३ टक्के आहे.  आरोपींना शिक्षा व्हावी स्थापन केलेल्या स्वतंत्र कक्षामुळेच (‘कन्विक्शन सेल’)हे साध्य झाले आहे.

पोलीस डायरीमध्ये नोंदलेल्या गुन्ह्याचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी शहरातील सात पोलीस ठाण्यांसह अन्य विशेष पथकांना दिलेल्या गाईडलाईनमुळे गुन्ह्याचा तपास आणि न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवण्याचे प्रमाण सप्टेंबर महिन्यापासून वाढले आहे.

नव्या वर्षामध्ये जानेवारी महिन्यात सातही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये ३०४ खटल्यांचे तर सत्र न्यायालयात १३ अशा ३१७ खटल्यातील आरोपींना शिक्षा झालेली आहे. खटल्यामधील भक्कम पुरावे आणि पूरक बाबी व्यवस्थित पुरविल्यामुळेच शिक्षांचे हे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात आले. गत वर्षात २०१८ मध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि सत्र न्यायालयामध्ये एकूण १५६१ खटले प्रलंबित होते. यातील ८३४ जणांना शिक्षा झाली. वर्षभरात शिक्षा होण्याच्या टक्केवारीचे प्रमाण ५३.४३ आहे. 

शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी काय केले?- १९९२ साली पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून शिक्षेचे प्रमाण १५ टक्क्यांच्या वर गेलेले नाही. वारंवार अनेक खटल्यांमधून आरोपी का सुटतात, याचा अभ्यास करून पोलीस आयुक्तांनी न्यायालयातून शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी सेशन कोर्ट आणि जेएमएफसी कोर्टासाठी स्वतंत्ररित्या कन्विक्शन सेल स्थापन करण्यात आला आहे.

यामध्ये एक स्वतंत्र अधिकारी, त्यांच्या सोबतीला ४ कर्मचारी नेमले आहेत. त्यांनी साक्षीदारांना वेळेवर कोर्टात हजर करणे, त्यांनी तपासात काय मदत करायची, मुद्देमाल हजर करणे, समन्स आणि व वॉरंट वेळेवर बजावले जाईल, याची दक्षता घेत आहेत. यामुळेच गत सप्टेंबर २०१८ पासून शिक्षा होण्याचे प्रमाण अनुक्रमे ६३, ७१, ७९, ८९ टक्क्यांवर गेले असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी स्पष्ट केले. 

जानेवारीमधील पोलीस ठाणेनिहाय निकाल पोलीस ठाणे    खटले    निकाल     टक्के 

  • - फौजदार चावडी    ९९    ८७    ८७.८८
  • - जेलरोड        ३४    २५    ७३.५३
  • - एमआयडीसी    ४२    ३१    ७५.६१
  • - जोडभावी पेठ    २७    १७    ६२.९६
  • - सदर बझार    ३९    ३९    १००
  • - विजापूर नाका    ५०    ४०    ८१.६३
  • - सलगर वस्ती    २६    २३    ८८.४६
  • - विभाग १        २०२    १६०        ७९.६०
  • - विभाग २        ११५    १०२    ९३.५०
  •     एकूण         ३१७    २६२    ८३
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय