सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना मातृशोक
By आप्पासाहेब पाटील | Updated: December 30, 2025 11:11 IST2025-12-30T11:11:33+5:302025-12-30T11:11:49+5:30
- अप्पासाहेब पाटील सोलापूर : सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख, वय वर्ष 90 वृद्धापकाळाने ...

सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना मातृशोक
- अप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख, वय वर्ष 90 वृद्धापकाळाने निधन झाले. आज सायंकाळी चार वाजता काळजापूर मारुती नजीक असलेल्या आमदार देशमुख यांच्या घराजवळून अंत्ययात्रा निघणार आहे. देगांव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
देगाव येथील त्यांच्या देशमुख मळा या शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार होता. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.