शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Solapur Brand; गृहउद्योगाद्वारे सोलापुरी भाकरीचा ब्रॅण्ड परराज्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 2:49 PM

रेवणसिद्ध जवळेकर  सोलापूर : सकाळचा स्वयंपाक अन् नंतरची भांडीधुणी झाल्यावर गृहिणींना पुढे वेळच वेळ असतो. नेमक्या याच वेळेत सूचलेली ...

ठळक मुद्देमुंबई, पुणेसह कर्नाटक, आंध्रप्रदेश अन् अगदी गुजरातपर्यंत सोलापुरी भाकरीचा ब्रॅण्ड पोहोचविला मकरसंक्रातीदिनी मोठ्या प्रमाणावर बाजरीच्या भाकरीची मागणीहोटगी रोडवरील शेखर सावजी यांच्याकडे येणाºया ग्राहकांनी या भाकरीला चांगलीच पसंती दिली

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : सकाळचा स्वयंपाक अन् नंतरची भांडीधुणी झाल्यावर गृहिणींना पुढे वेळच वेळ असतो. नेमक्या याच वेळेत सूचलेली चांगली कल्पना सत्यात उतरेल, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र चौथीपर्यंत शिकलेल्या सविता जगदिश मैंदर्गी या गृहिणीनं सूचवलेली कल्पना सत्यात आणत भाकरी विक्रेत्या म्हणून एक यशस्वी उद्योजिका बनली आहे. त्यांनी मुंबई, पुणेसह कर्नाटक, आंध्रप्रदेश अन् अगदी गुजरातपर्यंत सोलापुरी भाकरीचा ब्रॅण्ड पोहोचविला आहे. 

होटगी मार्गावरील विमानतळासमोरील हत्तुरे नगरातील एका घरात सविता या पती जगदिश, प्रदीप आणि संदीप या दोन मुलांसमवेत संसाराचा गाडा हाकत आहे. त्यांचे पती जगदिश हे औद्योगिक वसाहतीतील एलएचपी कंपनीत नोकरीस आहेत. सकाळची कामे अन् स्वयंपाक आटोपल्यावर मुले शाळेत अन् पतीराज ड्यूटीवर गेले की पुढे निवांत वेळ मिळायचा. रिकामा वेळ म्हणजे ‘खाली दिमाग सैतानका.. असे म्हटले जाते. सविता मैंदर्गी  यांनी मात्र मिळणाºया रिकाम्या वेळेची चांगलीच संधी साधली. घरच्या घरी भाकºया बनवून त्या विकल्या तर... हा विचार त्यांनी पतीराजासमोर बोलून दाखवला. पतीराजानेही त्यास होकार दिला. 

२००८ साली त्या स्वत: २०-२५ भाकºया बनवू लागल्या. घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये, खानावळीत त्या भाकºया विकू लागल्या. हॉटेल मालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि सविता यांनी हा छोटेखानी व्यवसायाचा विस्तार केला. होटगी रोडवरील शेखर सावजी यांच्याकडे येणाºया ग्राहकांनी या भाकरीला चांगलीच पसंती दिली.

उत्साह वाढला अन् सविता मैंदर्गी यांनी घरातील किचन रुमला भाकरीच्या कारखान्याचे स्वरुप दिले. आज शहरातील अनेक हॉटेल्सच नव्हे तर पुणे, मुंबई, बंगळुरुपर्यंत या भाकºया पोहोचत आहेत. भाकºया पोहोच करण्याचे, वसुली करण्याचे काम पती जगदिश हे करीत असताना दोन्ही मुलांचीही मदत या व्यवसायात होत आहे. मकरसंक्रातीदिनी मोठ्या प्रमाणावर बाजरीच्या भाकरीची मागणीही त्यांच्याकडे असते. 

एक भाकरी बनविण्यासाठी ८० पैसे मजुरीसविता मैंदर्गी यांच्या घरात सकाळी ६ ते १०.३० आणि ११ ते सायंकाळी ५ या वेळेत १५ महिला भाकºया बडवत असतात. एका भाकरीमागे त्यांना ८० पैसे मिळतात. ही मजुरी ८५ पैसे करण्याचे सविता यांनी बोलून दाखवले. 

 

गृहउद्योगाचा विस्तार करुसध्या घरातच माझा भाकरी बनविण्याचा गृहउद्योग सुरु केला आहे. सोलापूरची कडक भाकरी सर्वत्र प्रसिद्ध आहे. सोलापुरी चादरीबरोबर कडक भाकरीचे ब्रॅडिंग होणे गरजेचे आहे. शासकीय योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळाले तर गृहउद्योगाचा विस्तार करणार असल्याचे सविता मैंदर्गी यांनी सांगितले. 

मला रोजगार मिळाला. मजुरीच्या पैशातून संसाराला थोडीफार मदत होते. सविता यांचा हा गृहउद्योग आणखी वाढवा.-पार्वती हिप्परगी, महिला कामगार.

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायWomenमहिला