शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

सोलापूर - विजापूर रस्त्यावर पाच दुचाकींना भरधाव वेगातील कारने उडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 10:36 IST

सोलापूर : शहरातील विजापूर रोडवरून भरधाव वेगाने जाणाºया चारचाकी कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या चार ते पाच दुचाकीस्वारांना धडक देऊन ...

ठळक मुद्देचार ते पाच दुचाकीस्वारांना धडक देऊन लसूण विकणाºया रिक्षावर आदळलीया अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलेअचानक झालेल्या या विचित्र अपघातामुळे विजापूर रोडवर मोठा गोंधळ उडाला

सोलापूर : शहरातील विजापूर रोडवरून भरधाव वेगाने जाणाºया चारचाकी कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या चार ते पाच दुचाकीस्वारांना धडक देऊन लसूण विकणाºया रिक्षावर आदळली. हा थरार बुधवारी सायंकाळी ४.५0 वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये चार ते पाचजण जखमी झाले. 

बाबु मौला शेख (वय-४0 रा. सोरेगाव), विश्वास तोरटमल (वय-२२ रा. जुळे सोलापूर), अनिलकुमार पाटील (रा. वैष्णवी नगर, विजापूर रोड), सचिन शिरसवाड (वय-२९ रा.विजापूर रोड), दौला शेख (रा. सोलापूर) अशी जखमी झालेल्या लोकांची नावे आहेत.

बुधवारी सायंकाळी ४.५0 वाजण्यासच्या सुमारास चारचाकी कार (क्र.एमएच-१३ सीएस-६0९0) सोलापूरहून विजापूर रोडच्या दिशेने जात होती. ही कार वेगात धावत असताना आयटीआय पोलीस चौकी समोरील उजव्या बाजूला एका डंपरला ओव्हरटेक करीत होती. ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारचालकाचा ताबा सुटला. रस्त्याच्या कडेला असलेल्या चार ते पाच मोटरसायकलीला धडाधड धडका देत पुढे जाऊन लसूण विक्री करणाºया टमटमला धडकून पलटी झाली. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले. 

अचानक झालेल्या या विचित्र अपघातामुळे विजापूर रोडवर मोठा गोंधळ उडाला. नेमके काय झाले याचा अंदाज लोकांना येत नव्हता. अपघाताच्या ठिकाणी वाहनचालकांची व बघ्यांची मोठी गर्दी झाली. कारचालक शिरीष प्रकाश शेळके (वय-४६ रा. दत्त नगर, कुमठेकर हॉस्पिटल मागे सोलापूर) याने दिलेल्या धडकेत मोटरसायकल (क्र. एमएच-१३ सीएच-८९७६, एमएच-१३ सीआर-८६१६, एमएच-१३ एआर-८0३६, एमएच-१३ बीएम-२६७५) या दुचाकींचे मोठे नुकसान झाले.  या अपघातामध्ये कार चालक शिरीष शेळके हा देखील जखमी झाला आहे. 

अपघातानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास काळे, पोलीस उपनिरीक्षक मांजरे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन उलटलेली चारचाकी गाडी सरळ केली.

गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दारूच्या बाटल्या, सोडा बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, चपला मिळाल्या असून चालक दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी लसूण विकणाºया बागवान नावाच्या व्यापाºयाने कारचालकाने भरधाव कार चालवून बेफाम गाडी चालवित इतर गाड्यांना ठोकरल्याचे सांगितले. कारगाडीमध्ये चालकासोबत इतर तीन ते चार जण होते, परंतु अपघातानंतर गाडीतून बाहेर पडून ते सर्वजण पळून गेल्याचेही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

कारमधील तो पोलीस कोण?

  • कारचा अपघात घाला तेव्हा आतध्ये चालक शिरीष शेळके याच्यासह चारजण होते. अपघात झाल्यानंतर कारमधुन तिघे तत्काळ बाहेर आले त्यात दोन महिला होत्या सर्वजण जखमी आवस्थेत घटनास्थळावरून पळुन गेले अशी चर्चा अपघात पहाणाºया लोकांमध्ये रंगली होती. कारमधील तो पोलीस कोण? याबाबत तर्क वितर्क लढविले जात होते. 
टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातhighwayमहामार्ग