Solapur: बिहारच्या कामगाराचा हॉटेलमधील मारहाणीत मृत्यू, दोघांना अटक 

By रूपेश हेळवे | Updated: July 9, 2023 13:57 IST2023-07-09T13:57:15+5:302023-07-09T13:57:42+5:30

Solapur: बारमध्ये गेलेल्या बिहारमधील कामगाराचा तेथील तिघांशी वाद झाल्याने झालेल्या मारामारीत त्या कामगाराचा मृत्यू झाला. मुनाकुमार रामाधार सिंह ( वय ४४, रा. रतीगंज, बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे.

Solapur: Bihar laborer beaten to death in hotel, two arrested | Solapur: बिहारच्या कामगाराचा हॉटेलमधील मारहाणीत मृत्यू, दोघांना अटक 

Solapur: बिहारच्या कामगाराचा हॉटेलमधील मारहाणीत मृत्यू, दोघांना अटक 

- रुपेश हेळवे

सोलापूर - बारमध्ये गेलेल्या बिहारमधील कामगाराचा तेथील तिघांशी वाद झाल्याने झालेल्या मारामारीत त्या कामगाराचा मृत्यू झाला. मुनाकुमार रामाधार सिंह ( वय ४४, रा. रतीगंज, बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मुनिम विलास नारायण बोल्ली (वय ४८, रा. साईबाबा चौक) यांनी शनिवारी रात्री फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मृत मनुकुमार सिंह हा एमआयडीसी ती एका टेक्सटाईल इंडस्ट्रीज मध्ये कामाला होता. तो बुधवारी रात्री त्याच परिसरात असलेल्या एका बार मध्ये गेला. तेथे त्याची तीन जणांशी वादावादी झाली. त्या वादावादीमध्ये तीन जणांनी मिळून त्याला हाताने, लाथाबुक्क्यांनी व काचेची बाटली व काठीने मारहाण केली. यामुळे त्यांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, मनुकुमार याला गुरूवारी बेशुध्दावस्थेत पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणीदोघांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Solapur: Bihar laborer beaten to death in hotel, two arrested