Solapur: रात्री बस नसल्याने स्टँडवर झोपले, अज्ञाताने धमकी देऊन १८ हजार ढापले, बार्शी बस स्थानकवरील घटना
By शीतलकुमार कांबळे | Updated: March 13, 2024 18:38 IST2024-03-13T18:38:05+5:302024-03-13T18:38:40+5:30
Solapur: रात्री बार्शी बस स्थानकावरून गावी जाण्यास बस नसल्याने एक व्यक्ती तिथेच झोपला. अनोळखी व्यक्तीने जागे करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत खिशातील १८ हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Solapur: रात्री बस नसल्याने स्टँडवर झोपले, अज्ञाताने धमकी देऊन १८ हजार ढापले, बार्शी बस स्थानकवरील घटना
- शीतलकुमार कांबळे
बार्शी - रात्री बार्शी बस स्थानकावरून गावी जाण्यास बस नसल्याने एक व्यक्ती तिथेच झोपला. अनोळखी व्यक्तीने जागे करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत खिशातील १८ हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. बार्शी बस स्थानकावर ही घटना १३ मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. याबाबत धारलिंग राम हिरे (वय ६० रा. भानसळे ता. बार्शी) यांनी शहर पोलिसात याची तक्रार दिली. पोलिसांनी भांदवी ३९२ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.
यातील फिर्यादी हा आई आजारी असल्याने तिला ११ रोजी उपचारास येरवाडा येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. उपचार केल्यानंतर त्याने आईला धनकवडी येथील बहिणीकडे सोडले. फिर्यादी गावी जाण्यास बार्शीला १३ मार्च रोजी रात्री २ च्या सुमारास बार्शी बस स्थानकावर आला होता. रात्री बस नसल्याने तो एका फलाटावर झोपले होते. त्यावेळी त्याच्या खिशात पैसे होते. झोप लागताच खिसे चाचपडत असताना फिर्यादीने आरोपीस बाजूला ढकलून दिले. त्यावेळी आरोपीने फिर्यादीस त्याच्या गळ्यातील गमज्यानी खाली ओढून मारहाण केली. त्यास तुझ्या खिशातील पैसे दे नाहीतर तुला जीवे ठार मारीन अशी, धमकी देऊन खिशातील रक्कम जबरदस्तीने काढून नेली, अशी तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश वाघमोडे करत आहेत.