Solapur: रेल्वे प्रवाशांचा पुन्हा खोळंबा, हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा लेट

By रूपेश हेळवे | Updated: December 6, 2023 12:06 IST2023-12-06T12:06:04+5:302023-12-06T12:06:29+5:30

Solapur News: गेल्या अनेक दिवसापासून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले चित्र पहायला मिळत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. बुधवारीही सकाळी निघालेली हुतात्मा एक्सप्रेसचे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने जवळपास दीड तास ही गाडी जिंती येथे थांबलेली होती.

Solapur: Another disruption for train passengers, Hutatma Express delayed again | Solapur: रेल्वे प्रवाशांचा पुन्हा खोळंबा, हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा लेट

Solapur: रेल्वे प्रवाशांचा पुन्हा खोळंबा, हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा लेट

- रुपेश हेळवे
सोलापूर - गेल्या अनेक दिवसापासून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले चित्र पहायला मिळत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. बुधवारीही सकाळी निघालेली हुतात्मा एक्सप्रेसचे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने जवळपास दीड तास ही गाडी जिंती येथे थांबलेली होती. यामुळे प्रवाशांची मोठी गोची झाली. 

नेहमीप्रमाणे सुटणारी हुतात्मा एक्सप्रेस बुधवार सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सोलापुरातून निघाली. ही गाडी जिंती येथे जाताच पुन्हा या गाडीच्या इंजिनमध्ये खराबी झाली. यामुळे जवळपास दीड ते दोन तास गाडी तेथेच थांबली होती. आठवड्यातच दूसर्यांदा पुन्हा गाडीचे इंजिन खराब झाल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रवाशांमधून चीड व्यक्त करण्यात येत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.

 

Web Title: Solapur: Another disruption for train passengers, Hutatma Express delayed again