सोलापूर-अजमेर रेल्वे 60 दिवस अधिक धावणार
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 24, 2023 15:14 IST2023-01-24T15:12:14+5:302023-01-24T15:14:36+5:30
ही गाडी २९ मार्चपर्यंत अजमेरहून सोलापूरकडे धावणार आहे

सोलापूर-अजमेर रेल्वे 60 दिवस अधिक धावणार
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: अजमेर-सोलापूर-अजमेर (०९६२७/०९६२८) या गाडीला विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सोलापूर ते अजमेर रेल्वेला साधारण दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सोलापूर- अजमेर ही साप्ताहिक गाडी (०९६२८) २६ जानेवारी पर्यंत धावणार होती, यास आता ३० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अजमेर-सोलापूर (०९६२७) ही साप्ताहिक विशेष गाडी अजमेरहून २५ जानेवारी पर्यंत धावणार होती, आता ही गाडी २९ मार्च पर्यंत अजमेरहून सोलापूरकडे धावणार आहे. या गाडीच्या थांबे आणि रचनेत कोणताही बदल केलेला नाही, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.