Solapur: हनुमानाचे दर्शनासाठी आफ्रिकेचा गोल्ड बिझनेसमन घाणेगावात

By दिपक दुपारगुडे | Updated: December 31, 2023 18:08 IST2023-12-31T18:08:23+5:302023-12-31T18:08:48+5:30

Solapur News: हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी आफ्रिकेचा गोल्ड बिझनेसमन सोलेमन मेनसा बार्शी तालुक्यातील घाणेगावात आले होते. यावेळी परदेशी पाहुण्याच्या मुखातून जय हनुमानचा गजर निघाला.

Solapur: Africa's gold businessman at Ghanegaon for darshan of Hanuman | Solapur: हनुमानाचे दर्शनासाठी आफ्रिकेचा गोल्ड बिझनेसमन घाणेगावात

Solapur: हनुमानाचे दर्शनासाठी आफ्रिकेचा गोल्ड बिझनेसमन घाणेगावात

- दीपक दुपारगुडे 
सोलापूर - हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी आफ्रिकेचा गोल्ड बिझनेसमन सोलेमन मेनसा बार्शी तालुक्यातील घाणेगावात आले होते. यावेळी परदेशी पाहुण्याच्या मुखातून जय हनुमानचा गजर निघाला. हनुमानाचे दर्शन घेऊन धन्य झाल्याची भावना यावेळी विदेशी पर्यटक सोलेमन मेनसा यांनी व्यक्त केली.

बार्शी तालुक्यातील घाणेगावच्या हनुमान यात्रा प्रत्येक वर्षी पार पडते. या यात्रेची ख्याती ऐकून आफ्रिकाचे गोल्ड बिझनेसमन मिस्टर सोलेमन मेनसा हे हनुमान यात्रेत येऊन दर्शन घेऊन गावकऱ्यांना मी हनुमान चरणी लीन होऊन धन्य झालो, अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी भजनी मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत हनुमान मंदिरात केले. यावेळी धर्मराज गाडे, आनंद काशीद, रंजीत पाटील, विजय चवरे, बबन काटे, पोपट जाधव, हरी चवरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Solapur: Africa's gold businessman at Ghanegaon for darshan of Hanuman