शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

सोलापुरात दररोज तब्बल ६ कोटी लिटर पाणी वाया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 4:03 AM

१० टक्के पाण्याची चोरी; तीन मुख्य स्रोतांतून पाणीपुरवठा, दर वाढविण्याआधी गळती, चोरी थांबविण्याची मागणी

- शीतलकुमार कांबळेसोलापूर : शहराला पुरविल्या जाणाऱ्या पाण्यापैकी ३० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच तब्बल सहा कोटी लिटर पाणी दररोज वाया जाते. पाण्याचे दर वाढविण्यापेक्षा वाया जाणारे पाणी आधी थांबवायला हवे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.शहराची लोकसंख्या सुमारे ११.५ लाख इतकी आहे. दिवसाला प्रति माणशी१०० ते १०५ लिटर इतके पाणी महापालिकेतर्फे शहराला पुरविण्यात येते. विविध स्रोतांच्या माध्यमातून महापालिका १६० एमएलडी पाण्याचा उपसा करते, तर सुमारे १०० एमएलडी पाणी प्रत्यक्ष सोलापूरकरांना मिळते. गळती, औद्योगिक वापर, प्युरिफिकेशन लॉस, पाणी शहराकडे आणताना होणारा काही प्रमाणातील अपव्यय मिळून सुमारे ६० एमएलडी, म्हणजेच सहा कोटी लिटर पाणी वाया जाते.उजनी धरण ते सोलापूर शहर अशी थेट पाईपलाईन (११० किलोमीटर) ४० टक्के , टाकळी येथील बंधारा ५० टक्के व हिप्परगा तलाव येथून १० टक्के इतके पाणी शहरासाठी वापरले जाते. महापालिकेला प्रत्येक १ हजार लिटरसाठी सरासरी १३ रुपये इतका खर्च येतो. पाण्याची गळती ३० टक्के इतकी असून, सुमारे १० टक्के पाण्याची चोरी होते. नागरिकांसाठी आकारण्यात येणारा पाण्याचा दर हा १००० लिटरमागे ११.२५ रुपये इतका आहे. सध्या सरासरी पाण्याची थकबाकी ही ३.५ कोटी असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी भूसंपादनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. माढा, मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यांतील ३३ गावांचे ६३१ गट निश्चित करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होणाºया उजनी ते सोलापूर समांतर दुहेरी जलवाहिनीच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होत आहे. उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे प्रत्यक्ष पाईप टाकण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागू शकतो.11,50,000 सोलापूरची लोकसंख्या100-105 लिटर पाणी पालिका प्रति माणशीदिवसाला पुरवते30% पाण्याची गळती10% पाण्याची चोरी"11.25-11.70 घरगुती दर (प्रति एक हजार लिटर)"35.10-37.80 व्यावसायिक दर (प्रतिएक हजार लिटर)"11,556 अर्धा इंची पाईप असेल, तर वार्षिक दर"23,108 पाऊणइंची पाईप असेल तर वार्षिक दर3.5 कोटी रुपये पाणीपट्टी थकीत असल्याचे महापालिकेतर्फे सांगितले.160 एमएलडी पाण्याचा उपसा विविध स्रोतांच्या माध्यमातून रोज पालिका करतेशहरात पाणी आणण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप जुने झाले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पाणी गळती होते. या पाईपलाईन दुरुस्तीचा प्रस्ताव जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून ठेवण्यात आला आहे.- संजय धनशेट्टी,सार्वजनिक आरोग्य अभियंताशहरात नवी पाईपलाईन गरजेची आहे. पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञानही जुने झाले आहे. नव्या तंत्राने पाणी शुद्ध केल्यास या प्रक्रियेतून जे पाणी वाया जात होते, त्यावर नियंत्रण आणता येऊ शकते.- विलास लोकरे, अध्यक्ष,सीना-भीमा नदी संघर्ष समिती

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई