Solapur: अल्पवयीन मुलीला बिअर पाजत अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळले दाेन लाख

By रूपेश हेळवे | Updated: May 21, 2023 16:30 IST2023-05-21T16:30:07+5:302023-05-21T16:30:23+5:30

Solapur: सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी प्रेमाचे नाटक करत तिला लॉजवर नेऊन जबरदस्तीने बिअर पाजून एका तरुणाने अत्याचार केला.

Solapur: A minor girl was tortured by drinking beer, threatened to make the photo go viral, 2 lakhs was extorted | Solapur: अल्पवयीन मुलीला बिअर पाजत अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळले दाेन लाख

Solapur: अल्पवयीन मुलीला बिअर पाजत अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळले दाेन लाख

- रूपेश हेळवे
सोलापूर : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी प्रेमाचे नाटक करत तिला लॉजवर नेऊन जबरदस्तीने बिअर पाजून एका तरुणाने अत्याचार केला. त्यानंतर अत्याचारावेळीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या कडून २ लाख रूपये घेतल्याप्रकरणी ओंकार बाळासाहेब मोरे ( वय २३, रा. सोलापूर ) याच्यावर बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.

पीडितेशी आरोपीची मागच्या वर्षी ओळख झाली हाेती. त्या ओळखून आरोपीने पीडितेसोेबत प्रेमाचे नाटक करत तिला नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रथम लॉजवर नेत तिला बिअर पाजून ती शुध्दीत नसताना तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळीचे तिचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत दिली. शिवाय आरोपीने पीडितेकडून २ लाख रूपये घेत अत्याचारातील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला असल्याची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Solapur: A minor girl was tortured by drinking beer, threatened to make the photo go viral, 2 lakhs was extorted