Solapur: मावशीची नजर चुकवून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं
By रवींद्र देशमुख | Updated: August 19, 2023 20:11 IST2023-08-19T20:11:23+5:302023-08-19T20:11:44+5:30
Solapur: अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचं प्रमाण सोलापूर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढू लागले आहे. असाच प्रकार नव्यानं शुक्रवारी घडला.

Solapur: मावशीची नजर चुकवून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं
- रवींद्र देशमुख
सोलापूर - अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचं प्रमाण सोलापूर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढू लागले आहे. असाच प्रकार नव्यानं शुक्रवारी घडला. मावशी घरी नसल्याचे पाहून गोडीगुलाबीनं फूस लावून १७ वर्षाच्या मुलीला पळवून नेले. तिची शोधाशोध करुनही सापडली नाही म्हणून मावशीने थेट पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली आहे.
यातील पिडिता ही आपल्या मावशीकडे शहरातील एका भागामध्ये राहतात. मावशी शिलाईचे काम करुन आपली उपजीविका भागवते. कामाच्या निमित्ताने ती गेली होती. अज्ञात तरुणानं नेमकी ही संधी साधून पिडितेशी ओळख वाढवून तिच्याशी सलगी केली. १४ ऑगस्ट रोजी ती दुपारी साडेतीनच्या सुमारास गायब झाली. मावशीला घरी आल्यानंतर मुलगी दिसली नाही म्हणून तिचा शोध घेतला. यापूर्वीही ती गेली असल्याने ती पर येईल म्हणून दोन-तीन दिवसांनी नातलगांकडेही, मैत्रिणींकडे चौकशी केली मात्र ती सापडली नाही. यावर सारेच घाबरले. शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार गुन्हा नोंदला आहे.