Solapur: विद्युत तारेची ठिणगी पडून सोलापुरात घर पेटलं; सोनं अन् रोकडही जळून खाक
By Appasaheb.patil | Updated: December 7, 2023 15:09 IST2023-12-07T15:09:17+5:302023-12-07T15:09:55+5:30
Solapur News: शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या उत्तर कसबा पत्रा तालीम भागात राहणाऱ्या सुहास चाबुकस्वार यांच्या घराला गुरूवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली.

Solapur: विद्युत तारेची ठिणगी पडून सोलापुरात घर पेटलं; सोनं अन् रोकडही जळून खाक
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या उत्तर कसबा पत्रा तालीम भागात राहणाऱ्या सुहास चाबुकस्वार यांच्या घराला गुरूवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत घरातील प्रापंचित सामान याचबरोबरच दोन लाखांची रोख रक्कम आणि दीड तोळे सोनं असलेला डबा जळून खाक झाला.
उत्तर कसबा, पत्रा तालीम परिसरात सुहास विठ्ठल चाबुकस्वार यांचे दोन मजली घर आहे. पहिल्या मजल्यावर घराशेजारी असलेल्या विद्युत खांबावरील विजेची ठिणगी पडून ही आगीची घटना घडली. दरम्यान, घराजवळच्या विद्युत मंडळाच्या जुन्या वायरिंगला शॉर्टसर्किट होवून आग लागल्याचं चाबुकस्वार यांचे म्हणणे आहे. अग्निशामक दलाच्या तीन पाण्याच्या गाड्या मार्फत आग विझविण्यात आली. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. घरातील महत्वाची कागदपत्रे, कपडे, फ्रिज, कुलर, वॉशिंग मशीन व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पाेलिस घटनास्थळी दाखल झाले होते. शिवाय बघ्यांची गर्दीही मोठया प्रमाणात झाली होती. या घटनेची नोंद फौजदार चावडी पेालिस ठाण्यात झाली आहे.