Solapur: लघुशंकेला थांबल्यावर दीड लाखाच्या दागिन्यांची पिशवी पळवली! विजापूर रोडवरील घटना; गुन्हा दाखल
By रवींद्र देशमुख | Updated: December 7, 2023 15:22 IST2023-12-07T15:22:20+5:302023-12-07T15:22:41+5:30
Solapur News: लघुशंकेला थांबल्यावर अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी चोरून नेली. ही घटना गुरूवार ७ डिसेंबर २०२३ रोजी विजापूर रोडवरील पंचरत्न हॉटेलच्या पुढे चंडक मळ्यासमोर घडली.

Solapur: लघुशंकेला थांबल्यावर दीड लाखाच्या दागिन्यांची पिशवी पळवली! विजापूर रोडवरील घटना; गुन्हा दाखल
- रवींद्र देशमुख
सोलापूर - लघुशंकेला थांबल्यावर अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी चोरून नेली. ही घटना गुरूवार ७ डिसेंबर २०२३ रोजी विजापूर रोडवरील पंचरत्न हॉटेलच्या पुढे चंडक मळ्यासमोर घडली.
दरम्यान, अशोक पोमू जाधव (वय ५३, रार. सिमलानगर, विजापूर रोड, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अशोक जाधव हे चंडक मळ्यासमोर गाडी थांबवून सोने ठेवलेली कापडी बॅग गाडीच्या हॅन्डलला अडकवून लघुशंकेला रस्त्याच्या खाली आडोशाला गेले. एवढ्यात चोरट्याने संधी साधून गाडीला अडकविलेली सोन्यांचे दागिने ठेवलेली पिशवी चोरून नेली.
या घटनेत ४०.०७७ ग्रॅमचे सोन्याची चैन, ५.५९० ग्रॅमचे सोन्याची अंगठी, ६.६१० ग्रॅमचे सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्या लग्ससराई असल्याने महिलांनी विवाह समारंभ व अन्य समारंभात दागिने वापरताना काळजीपूर्वक वापरावे, कार्यक्रमाच्या निमित्ताने घराबाहेर जाताना शेजारी लोकांना सांगावे, जेणेकरून चोरीसारख्या घटना होणार नाहीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.