शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Solapur: माळशिरसमध्ये ९६ हजार रेकॉर्ड तपासले, कुणबीचे १८५ पुरावे लागले हाती

By काशिनाथ वाघमारे | Updated: November 9, 2023 19:25 IST

Solapur News : राज्यभर कुणबी पुरावा शोधमोहीम सुरू आहे. माळशिरस तालुक्यात महसूल विभागाने विशेष सहायता कक्ष स्थापन करून ८ नोव्हेंबरपर्यंत जुन्या जन्म, मृत्यू नोंदी, जुने सातबारे अशा प्रकारचे ९६ हजार रेकॉर्ड तपासण्यात आले

- काशिनाथ वाघमारे सोलापूर - राज्यभर कुणबी पुरावा शोधमोहीम सुरू आहे. माळशिरस तालुक्यात महसूल विभागाने विशेष सहायता कक्ष स्थापन करून ८ नोव्हेंबरपर्यंत जुन्या जन्म, मृत्यू नोंदी, जुने सातबारे अशा प्रकारचे ९६ हजार रेकॉर्ड तपासण्यात आले असून, यामध्ये कुणबी उल्लेख असलेले मराठी व मोडी लिपीतील १८५ पुरावे मिळाले असून, १३ विभागामार्फत शोधमोहीम सक्रिय झाली आहे.

कुणबी उल्लेख असल्याचे विविध जुन्या कागदपत्रांची तपासणी सुरू असून, तालुकास्तरावर १९०० च्या आसपासचे दप्तर आढळत असून यामध्ये बहुतांश नोंदी मोडी लिपीत आहेत. त्यामुळे भाषेची अडचण भासत असून, या तपासणीसाठी मोडी लिपीचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तींना पाचारण करण्यात येत आहे. तालुक्यातील संगम, बाभुळगाव, वेळापूर या गावांतील जास्त नोंदी आढळल्या असून, इतरत्रही नोंदी आढळताना दिसत आहेत .गेल्या काही महिन्यांत या नोंदीच्या आधारे तीन दाखले लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत.

कुणबी उल्लेख असल्याची जुन्या कागदपत्रांची शोधमोहीम सुरू आहे. तरी याबाबतची नोंद असलेली जुनी कागदपत्रे कोणाकडे आढळल्यास संबंधितांनी दाखल्याबाबत अर्जासोबत तहसील कार्यालयाकडे द्यावीत.-सुरेश शेजूळ, तहसीलदार, माळशिरस

महसूलच्या १३ विभागात तपासणीखासरा पत्रक, पाहणी पत्रक, नागरिकाचे राष्ट्रीय रजिस्टर १९५१, नमुना नंबर १ व २ हक्क नोंद पत्र, सातबारा उतारा, गाव नमुना १४, खरेदी विक्री, जन्म मृत्यू नोंद, प्रवेश निर्गम नोंद वही अशा कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून, महसूलबरोबरच १३ विभागानुसार जुन्या शासन दरबारी असणाऱ्या जातीबद्दल उल्लेख गावस्तरीय कमिटी शाळा, ग्रामपंचायत तपासणी करणाऱ्या नोंदी यामध्ये तपासल्या जाणार आहेत .

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSolapurसोलापूर