बसखाली झोपलेल्या क्लीनरचा चाकाखाली चिरडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 19:19 IST2019-10-29T19:18:03+5:302019-10-29T19:19:49+5:30
सोलापूर शहरातील घटना; फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बसखाली झोपलेल्या क्लीनरचा चाकाखाली चिरडून मृत्यू
सोलापूर : हॉटेल अँबेसिडर समोरील नाकोडा रेसिडेन्सी जवळ खाजगी बस खाली झोपलेल्या क्लीनरच्या डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला.
गणेश वसंत सुरवसे (वय 38 रा.शिवाजी नगर बाळे सोलापूर) असे ठार झालेल्या क्लीनरचे नाव आहे. गणेश सुरवसे हा मंगळवारी नाकोडा रेसिडेन्सी जवळ लावलेली बस पाण्याने धूत होता. बस धुऊन झाल्यानंतर तो खाजगी बस (क्र- एम एच 43 0733) च्या खाली आराम करण्यासाठी झोपला होता.
सोलापुर-पुणे धावणारी या प्रवासी बसचा नंबर आला होता. त्यामुळे चालक दुपारी 1.30 वाजता गडबडीने बस काढत होता. बस काढत असताना पाटी मागील चाकाखाली सापडून गणेश सुरवसे हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच चावडी पोलीस ठाण्याचे एपीआय संतोष माने व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. पोलिसांनी खासगी बस चालकास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.