सोलापूर-तिरुपती साप्ताहिक रेल्वेला साठ दिवसांची मुदतवाढ

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: July 30, 2023 13:44 IST2023-07-30T13:43:50+5:302023-07-30T13:44:05+5:30

साठ दिवसात या दोन्ही गाड्यांचे तिरूपतीला एकूण आठ फेऱ्या होतील. यामुळे वेटिंगचे प्रमाण खूप कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे

Sixty days extension of Solapur-Tirupati weekly train | सोलापूर-तिरुपती साप्ताहिक रेल्वेला साठ दिवसांची मुदतवाढ

सोलापूर-तिरुपती साप्ताहिक रेल्वेला साठ दिवसांची मुदतवाढ

सोलापूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सोलापूरहून तिरूपतीकडे जाणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीला साठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. सोलापूर-तिरुपती ही साप्ताहिक विशेष गाडी (क्र.०१४३७) सोलापूरहून शुक्रवार, २८ जुलै पर्यंत धावणार होती. आता ही गाडी २९ सप्टेंबर पर्यंत धावणार आहे. सोलापूर-तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी (क्र.०१४३८) सोलापूरहून शुक्रवार, २८ जुलै पर्यंत धावणार होती. आता ही गाडी २९ सप्टेंबर पर्यंत धावणार आहे.

साठ दिवसात या दोन्ही गाड्यांचे तिरूपतीला एकूण आठ फेऱ्या होतील. यामुळे वेटिंगचे प्रमाण खूप कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यासोबत इतर गाड्यांना मुदतवाढ मिळाली आहे. सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (क्र.०१४३५) सोलापूरहून मंगळवार, २५ जुलै पर्यंत धावणार होती. आता ही गाडी २६ सप्टेंबर पर्यंत धावणार आहे.

Web Title: Sixty days extension of Solapur-Tirupati weekly train

टॅग्स :railwayरेल्वे