नवी मुंबईहून तळेहिप्परग्यात आलेल्या महिलेसह जिल्ह्यात दिवसभरात आढळले सहा कोरोना बाधित रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 16:30 IST2020-06-01T16:29:06+5:302020-06-01T16:30:43+5:30
आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू; ३२ जणांवर उपचार सुरू

नवी मुंबईहून तळेहिप्परग्यात आलेल्या महिलेसह जिल्ह्यात दिवसभरात आढळले सहा कोरोना बाधित रूग्ण
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा हळूहळू वाढत आहे. सोमवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगा येथे नवी मुंबईहून आलेली महिला कोरोना बाधित आढळली़ याशिवाय सोमवारी जिल्ह्यात सहा कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३२५ जणांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १ हजार २९० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १ हजार २४८ निगेटिव्ह तर ४२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी १२५ जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यात ११९ जण निगेटिव्ह तर ६ जण पॉझिटिव्ह आढळून आले. सोमवारी अक्कलकोट (मधला मारूती गल्ली), अक्कलकोट (उत्कर्ष नगर), अक्कलकोट (संजय नगर), तळेहिप्परगा (ता. उ. सोलापूर) व बार्डी (ता़ पंढरपूर) येथे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.