शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

रिकाम्या बेंचसमोर उभारून सर जेव्हा शिकवितात; तेव्हा विद्यार्थी घरी मोबाईलसमोर मान हलवितात !

By appasaheb.patil | Updated: June 11, 2020 11:16 IST

‘आॅनलाईन प्रणाली’ झपाट्यानं आत्मसात : ९० टक्के विद्यार्थ्यांचा खासगी क्लासेसच्या नव्या प्रयोगाला प्रतिसाद

ठळक मुद्देसोलापूरकरांकडून आॅनलाइन शिक्षण प्रणाली झपाट्यानं आत्मसात होत आहेसाधरण: ९० टक्के विद्यार्थ्यांचा खासगी क्लासेसच्यानव्या प्रयोगाला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आलेस्पर्धेच्या जगात ९० टक्के गुण म्हणजेच यश, हा बहुतेक पालकांचा समज असल्याने कोचिंग क्लासेस ही एक आता काळाची गरज बनली

सुजल पाटील

सोलापूर : शाळेचा परिसर...विद्यार्थ्यांचा गोंधळ.. तासातासाला वाजणारी घंटा.. विषयानुसार बदलणारे शिक्षक... दुपारची जेवणाची सुट्टी.. शाळा संपत येताच घरी जाण्याची गडबड, उत्कंठा़...या सर्वच गोष्टींना आता विद्यार्थी आठवू लागले आहेत़ त्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन काळात सुरू झालेल्या आॅनलाइन शिक्षण प्रणालीमुळे़ रिकाम्या बेंचसमोर उभे राहून सर जेव्हा शिकवू लागतात तेव्हा घरी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या माना आपोआप हलू लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन काळात आणि नंतरही सोलापूरकरांकडून आॅनलाइन शिक्षण प्रणाली झपाट्यानं आत्मसात होत आहे. साधरण: ९० टक्के विद्यार्थ्यांचा खासगी क्लासेसच्यानव्या प्रयोगाला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.

स्पर्धेच्या जगात ९० टक्के गुण म्हणजेच यश, हा बहुतेक पालकांचा समज असल्याने कोचिंग क्लासेस ही एक आता काळाची गरज बनली आहे. त्यात कित्येक मुलांचे आई-वडील दोघेही नोकरी करणारे असल्याने विद्यार्थ्यांसाठी खासगी क्लासेस आवश्यकही असल्याचे सांगितले जाते. वह्या, पुस्तकांच्या माध्यमातून शिक्षण घेणारे विद्यार्थी आता मोबाईलवर व्हिडिओ पाहून शिक्षण पूर्ण करू लागल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खासगी क्लासेसधारकांनी आॅनलाईन शिकवण्या सुरू केल्या. या डिजिटल शिक्षण प्रणालीला सोलापुरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी खासगी क्लासेसधारकांकडे अधिक आकर्षित होत आहेत. 

अशी चालते आॅनलाईन क्लासेस प्रणाली...- आॅनलाईन व्हिडिओ एडिटिंग प्रणालीचा वापर करून प्रत्येक विषयाची ४० ते ५० मिनिटांची व्हिडिओ क्लिप तयार करून ती व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल किंवा अ­ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. विद्यार्थी आपल्या सोयीनुसार, वेळेनुसार तो व्हिडिओ मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपवर पाहून त्या-त्या विषयाचा अभ्यास घरी बसूनच करीत आहे. जर एखाद्या विद्यार्थ्यास त्या विषयाबाबत अडचण असेल तर तो विद्यार्थी त्याच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आपली अडचण शेअर करतो. नंतर त्या अडचणींवर संबंधित प्राध्यापक त्या विद्यार्थ्याला त्वरित उत्तर देऊन त्या शंंकेचे निरसन करतात. यामुळेच आॅनलाईन शिकवणीला विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत. आॅनलाईन शिकविलेल्या अभ्यासक्रमाचे नोट्स विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत आहेत. आॅनलाईन शिकवणीकरिता कलबुर्गी क्लासेस यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन एक वेगळे अ­ॅप विकसित केले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या अन्य अडचणींबाबत शहरातील सर्वच खासगी क्लासेसधारक झूम अ‍ॅपद्वारे बैठका घेऊन पालक, विद्यार्थी व क्लासेसमधील प्राध्यापकवर्ग संवाद साधत असल्याची माहिती प्रा. शशिकांत कलबुर्गी यांनी दिली. 

लाईव्हपेक्षा व्हिडिओ शिक्षण प्रणालीकडे ओढा- सोलापुरात ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी शहरात येत असतात. ग्रामीण भागातील ९० टक्के पालकांकडे स्मार्ट फोन नाही. एखाद्या पालकाजवळ फोन असतो; मात्र नेटवर्क नसते. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी आॅनलाईन शिक्षण प्रणालीचा उपयोग होत आहे. आम्ही कलबुर्गी क्लासेसकडून विद्यार्थ्यांसाठी खास अ‍ॅप विकसित केले आहे. अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तयार करून तो अ‍ॅपवर अपलोड आम्ही करतो, विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार तो व्हिडिओ पाहत आहेत. - प्रा. शशिकांत कलबुर्गी, कलबुर्गी क्लासेस 

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तत्काळ आम्ही आमच्या क्लासेसतर्फे आॅनलाईन क्लासेसची प्रक्रिया राबवली. येत्या काही दिवसांत अ‍ॅप विकसित करणार आहोत. सध्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवित आहोत. -प्रा. सुशांत माळवे, लॉजिक अ‍ॅकॅडमी

शिक्षणात खंड पडू नये, यासाठी आॅनलाईन क्लासेसवर जास्तीचा भर दिला जात आहे. आम्ही आमच्या क्लासेसतर्फे प्रत्येक विषयाचा ६० मिनिटांचा व्हिडिओ तयार करून तो व्हॉट्सअ‍ॅपद्वारे शेअर करून विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यास सांगतो. या आॅनलाईन प्रणालीला सोलापुरात ८० ते ९० टक्के विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभत आहे.  - रतन अगरवाल, जय अ‍ॅकॅडमी

टॅग्स :SolapurसोलापूरonlineऑनलाइनdigitalडिजिटलEducationशिक्षणSchoolशाळा