विमानतळाप्रमाणेच आता रेल्वे प्रवाशांकडून होणार ‘युजर चार्ज’ वसूल

By appasaheb.patil | Published: September 19, 2020 06:12 PM2020-09-19T18:12:14+5:302020-09-19T18:12:26+5:30

रेल्वे विभागाने जारी केली सूची : देशातील वर्दळीच्या हजार स्थानकाच्या यादीत सोलापूरचा समावेश

Similar to airports, 'user charges' will now be levied on train passengers | विमानतळाप्रमाणेच आता रेल्वे प्रवाशांकडून होणार ‘युजर चार्ज’ वसूल

विमानतळाप्रमाणेच आता रेल्वे प्रवाशांकडून होणार ‘युजर चार्ज’ वसूल

Next

सोलापूर : विमानतळाप्रमाणेच आता रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांकडून ‘युजर चार्ज’ वसूल करण्यात येणार आहे़ रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या जास्त गर्दीच्या व महत्त्वाच्या १ हजार रेल्वे स्थानकाच्या यादीत सोलापूर रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे़ त्यामुळे आता सोलापूर रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाºया प्रवाशांना तिकिटासाठी जास्तीचा खर्च करावा लागणार आहे़

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता़ या लॉकडाऊनमुळे देशभरातील प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती़ लॉकडाऊन काळात मालवाहतूक, किसान रेल, पार्सल सेवेच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्नही कमी  मिळाले़ त्यामुळे रेल्वेच्या एकूण उत्पन्नात या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात घट झाली़ त्यामुळे विमानतळाप्रमाणे आता यापुढे रेल्वे स्थानकावर रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेतून करण्यात येणारी कामे युजर चार्र्जेसमधून आलेल्या पैशातून करण्याचे नियोजन सुरू आहे़ त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर ज्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या अधिक आहे त्या रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाºया रेल्वे प्रवाशांकडून युजर चार्र्ज वसूल करण्यात येणार आहे़ 
-------------
काय आहे युजर चार्ज़...
भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जातो़ तसेच विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात करण्यात येतात़ त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून निधी दिला जातो; मात्र यापुढे रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे युजर चार्जेसमधून मिळालेल्या पैशातून करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार सुरू आहे़ त्यामुळे आता रेल्वे स्टेशनवरून प्रवास करणाºया प्रत्येक प्रवाशांकडून तिकिटामागे एक ठराविक रक्कम युजर चार्जेस म्हणून वसूल करण्यात येणार आहे़ ही रक्कम काही पैसे किंवा रुपयात असणार आहे़ 
--------------
यामुळे आले सोलापूरचे नाव...
देशातील १५ टक्के रेल्वे स्टेशनवर युजर चार्ज आकारला जाणार आहे़ अगोदर ए-१ आणि ए श्रेणीच्या मोठ्या स्टेशनला युजर चार्ज लागू करण्यात येईल. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून कमाईच्या हिशोबानं स्टेशनची ‘श्रेणी’ निश्चित करण्यात आली आहे़ देशात सर्वाधिक कमाई करणारे ‘ए-१ श्रेणी’चे ७५ स्टेशन आहेत. यात सोलापूरचा समावेश करण्यात आला आहे़ सोलापूर रेल्वे स्थानकावरून दररोज ९८ रेल्वे गाड्या धावतात, त्यातून साधारणपणे ४ ते ५ हजार प्रवासी प्रवास करतात़ 

सोलापूर रेल्वे स्थानकावरून प्रत्येक प्रवाशांकडून युजर चार्ज वसूल करण्याबाबत अद्याप सोलापूर विभागाला कोणत्याही प्रकारचा निरोप, पत्र प्राप्त झाले नाही़ त्यामुळे आताच यावर बोलणे योग्य नाही़ 
- प्रदीप हिरडे,
वरिष्ठ वाणिज्य मंडल व्यवस्थापक, सोलापूर विभाग.

Web Title: Similar to airports, 'user charges' will now be levied on train passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.