सांगोल्याचे सिद्धेश्वर स्वामी यांची सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 28, 2023 14:53 IST2023-01-28T14:53:42+5:302023-01-28T14:53:59+5:30

Siddheshwar Swami : सांगोला महाविद्यालयाचे प्रयोगशाळा परिचर व कॉलेज कर्मचारी युनियन, सोलापूरचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर स्वामी यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड झाली.

Siddheshwar Swami of Sangola was elected to the AGM of Solapur University | सांगोल्याचे सिद्धेश्वर स्वामी यांची सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड

सांगोल्याचे सिद्धेश्वर स्वामी यांची सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड

- बाळकृष्ण दोड्डी 
सोलापूर : सांगोला महाविद्यालयाचे प्रयोगशाळा परिचर व कॉलेज कर्मचारी युनियन, सोलापूरचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर स्वामी यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड झाली. त्यांचे नामनिर्देशन महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्चाऱ्यांमधून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले आहे. 

त्यानिमित्त कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूरच्यावतीने सांगोला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र गोटे, विभागीय सचिव अजिकुमार संगवे, कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूरचे अध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, माजी उपाध्यक्ष माणिक लिगाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Siddheshwar Swami of Sangola was elected to the AGM of Solapur University