शुभम चव्हाण ठरला वसंत केसरीचा मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 20:35 IST2024-02-10T20:34:25+5:302024-02-10T20:35:45+5:30
कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, रणजितसिंह शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विजेता पैलवान शुभम चव्हाण यास चांदीची गदा व प्रथम मानांकन एक लाख एक हजार रुपये रोख व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. उपविजेता राहुल काळे यांस ५१ हजार वसंत केसरी ट्रॉफी प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात आले.

शुभम चव्हाण ठरला वसंत केसरीचा मानकरी
मोहन डावरे -
सोलापूर / भाळवणी : शुभम चव्हाण आणि राहुल काळे यांच्यामध्ये ‘ वसंत केसरी ’ किताबासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये पै.शुभम चव्हाण याने राहुल काळे यास तीन गुनांनी मात करुन ‘ वसंत केसरी ’ किताब पटकावला. तर राहुल काळे उपविजेता ठरला. कारखान्याचे संस्थापक स्व. वसंतराव काळे यांच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्त कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणराव काळे बहहुउद्देशिय समाजसेवी संस्थेच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर अखिल भारतीय वसंत केसरी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.
कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, रणजितसिंह शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विजेता पैलवान शुभम चव्हाण यास चांदीची गदा व प्रथम मानांकन एक लाख एक हजार रुपये रोख व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. उपविजेता राहुल काळे यांस ५१ हजार वसंत केसरी ट्रॉफी प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात आले.
यावेळी आमदार यशवंत माने, आमदार शहाजीबापू पाटील, धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगेसर, शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख, भगिरथदादा भालके, युवराज पाटील आदी उपस्थित होते.