ईडीची वाट न पाहता आमची सीडी दाखवा - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 06:15 IST2020-11-25T06:14:54+5:302020-11-25T06:15:21+5:30

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ मंगळवारी  भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. तुम्ही ईडी लावाल तर आम्ही तुमची सीडी दाखवू असे आव्हान खडसेंनी फडणवीसांना दिले होते.

Show our CD without waiting for ED - Devendra Fadnavis | ईडीची वाट न पाहता आमची सीडी दाखवा - देवेंद्र फडणवीस

ईडीची वाट न पाहता आमची सीडी दाखवा - देवेंद्र फडणवीस

सोलापूर : ‘ तुम्ही ईडी लावाल तर आम्ही सीडी लावू’ म्हणताय. मग जरुर सीडी बाहेर काढा. कशाची वाट पाहताय? असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले.

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ मंगळवारी  भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. तुम्ही ईडी लावाल तर आम्ही तुमची सीडी दाखवू असे आव्हान खडसेंनी फडणवीसांना दिले होते. या विधानाची आठवण करुन देताच फडणवीस म्हणाले, इडीने आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर रेड टाकली असेल तर त्यांच्याकडे निश्चित काहीतरी माहिती असेल. त्याशिवाय ते रेड टाकत नाही. मला याबद्दल फारशी माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. चूक झाली असेल तर एजन्सी कारवाई करेल. आमच्या सरकारच्या काळातील वीज मंडळाच्या कारभाराची चौकशी करणार असाल तर खुशाल करा. 

Web Title: Show our CD without waiting for ED - Devendra Fadnavis