शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

टीका करताना भान ठेवून बोलायला हवं ; शिवराज पाटील-चाकुरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 10:29 IST

आंबेडकरांच्या नातवाने राज्य घटनेचा खून केला - सुशीलकुमार शिंदे

ठळक मुद्देकाँग्रेस - राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा प्रारंभदक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात हा शुभारंभ करण्यात आलादेशात ७० वर्षे काहीच झाले नाही असे म्हणणे देशातील जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहे - चाकूरकर

सोलापूर : डॉक्टर इमारत बांधू शकत नाही, गायक रोगी बरा करू शकत नाही, तसे राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नसणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा काय उपयोग? असा सवाल करीत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी भाजपच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष लक्ष्य केले. टीका करताना भान ठेवून बोलायला हवं, असा इशारा त्यांनी सत्ताधाºयांना दिला. 

काँग्रेस - राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा प्रारंभ करताना चाकूरकर बोलत होते़ दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात हा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना चाकूरकर यांनी सत्ताधारी भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.  देशात ७० वर्षे काहीच झाले नाही असे म्हणणे देशातील जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहे़  गेल्या साडेचार वर्षांत भाजप सरकारने नेमके काय केले? याचा शोध घ्यावा लागेल़ आरोप करणे खूप सोपे असते़ काम करणे महाकठीण, याचा प्रत्यय केंद्रातल्या सरकारला येत असावा़ आश्वासनं देणं सोपं, पण ती पाळताना किती कसरत करावी लागते याचा अनुभव आम्हाला आहे़ सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

हल्ली गांधी-नेहरु घराण्यावर सत्ताधारी पक्षाची मंडळी तोंडसुख घेत आहेत, असे सांगताना चाकूरकर म्हणाले, नेहरू यांच्याविषयी अपशब्द वापरणं हे नेहरुंवर नव्हे तर देशावर अन्याय करणारं ठरेल.  शेतकरी, शेतमजूर हा या देशाचा कणा़ तोच आता खिळखिळा बनत चालला आहे़ त्याला जबाबदार कोण? असा सवालही चाकूरकरांनी केला.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीविषयी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ते माझे चांगले मित्र आहेत़ बाबासाहेबांनी घटना लिहिताना सर्वधर्मसमभाव हा या देशाचा पाया असल्याचे नमूद केले़ पण आमचे मित्र जातीयवादी शक्तीबरोबर गेले, याचे मला खरे दु:ख  आहे़ एमआयएमसारख्या जातीयवादी शक्तींनी हा देश खिळखिळा केला़ त्यांची सोबत करायला नको होती.

उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या कार्यक्रमावेळी आ़ सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, आ़ रामहरी रुपनवर, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, उज्ज्वलाताई शिंदे,  जि. प. माजी अध्यक्ष बळीराम साठे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, चेतन नरोटे मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे, राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे, गणेश पाटील, बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, उत्तर सोलापूर तालुका राष्टÑवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रल्हाद काशिद यांची उपस्थिती होती़

आंबेडकरांच्या नातवाने राज्य घटनेचा खून केला- एमआयएमसारख्या धर्मांध पक्षासोबत आघाडी करून डॉ. बाबासाहेबांच्या नातवाने राज्यघटनेचा खून केला असून, भाजपा हा नरेंद्र मोदीसारख्या हुकूमशहाचा पक्ष असल्याची टीका काँग्रेसचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मार्डी येथे केली. - देशवासीयांनी गेल्या निवडणुकीत मोठ्या अपेक्षेने भाजपला सत्ता दिली; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत आपल्या देशातील लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवली, हे जनतेच्याही आता व्यवस्थित लक्षात आले आहे, अशी टीकाही शिंदे यांनी भाजपवर केली.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरShivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस