शॉर्टसर्किटने महावितरणचा ट्रान्सफार्मर जळाला, सरस्वती चौकातील घटना
By Appasaheb.patil | Updated: May 12, 2023 15:03 IST2023-05-12T12:57:37+5:302023-05-12T15:03:11+5:30
सरस्वती चौकात ॲडलान्स नावाचे कपड्याचे मोठे शाेरूम आहे. याठिकाणी अन्य दुकानांसह बँकाही आहेत

शॉर्टसर्किटने महावितरणचा ट्रान्सफार्मर जळाला, सरस्वती चौकातील घटना
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : शॉर्टसर्किटने सोलापूर शहरात असलेल्या सरस्वती चौकातील ट्रान्सफर्मर जळाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या, अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.
सरस्वती चौकात ॲडलान्स नावाचे कपड्याचे मोठे शाेरूम आहे. याठिकाणी अन्य दुकानांसह बँकाही आहेत. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास इमारतीखाली असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफर्मरला (डीपी) ला अचानक आग लागली. या आगीचे लोळ बाहेर पडत असल्याचे पाहताच नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलास फोन केला. त्यानंतर काही मिनिटात अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तत्पूर्वी महावितरणने त्या भागातील विद्युत पुरवठा बंद केला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मोठा मारा केला, त्यानंतर आग आटोक्यात आली. याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही दाखल झाले हाेते.