धक्कादायक; जन्मदात्या मातेने पाजले दोन चिमुकल्यांना विष,

By Appasaheb.patil | Updated: April 20, 2019 19:59 IST2019-04-20T19:52:01+5:302019-04-20T19:59:45+5:30

सोलापूरजवळ असलेल्या नान्नज येथील घटना, दोघींचाही जागीच अंत, विष पाजणारी आई अत्यावस्थेत

Shocking Two insects of twins, | धक्कादायक; जन्मदात्या मातेने पाजले दोन चिमुकल्यांना विष,

धक्कादायक; जन्मदात्या मातेने पाजले दोन चिमुकल्यांना विष,

ठळक मुद्दे- उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील घटना- आईने पाजले दोन मुलींना विषारी औषध- दोन मुलीं जागीच ठार, आईची प्रकृती गंभीर

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील रेश्मा कृष्णा भोसले हिने स्वत: च्या दोन मुली श्रावणी कृष्णा भोसले ( वय ४), श्रेया कृष्णा भोसले ( वय-२) यांना विष पाजून स्वत: ही फासी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यातील रेश्माही अत्यावस्थेत असून पुढील उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   

नान्नज गावापासून काही अंतरावर कृष्णात भोसले यांच्या शेतात कुटुंब राहत आहे. ते शेतमजुरी करून आपली उपजीविका करत होते. शनिवारी सकाळी कोटुंबिक कारणांच्या निमित्ताने पती व पत्नीमध्ये वाद झाला. या वादाचा राग मनात धरून दुपारी रेष्मा कृष्णा भोसले वय (२९) हिने आपली दोन मुली श्रावणी कृष्णा भोसले (वय ४), श्रेया कृष्णा भोसले (वय २) या आपल्या स्वताच्या मुलींना शेतातील फवारणीसाठी घरात ठेवलेले कराटे नावाचे विषारी द्रव्य पाजले. स्वताही औषध पिण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरात दोरखंड लावून गळफास घेण्याचा प्रयत्न केला.  घरासमोरील मोठ्या सिंटेक्स टाकीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजारील काही व्यक्तीने तिला बाहेर काढूले.  दोन  मृत मुलींना व रेश्मा भोसले हिला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केली आहे.या घडलेल्या घटनेने नान्नज व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील पोलीस तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवडे हे करीत आहेत.


 

Web Title: Shocking Two insects of twins,