धक्कादायक; दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 15:32 IST2020-05-15T15:30:21+5:302020-05-15T15:32:54+5:30
उघडेवाडी येथील घटना; पुण्याहून गावी वास्तव्यास आलेल्या कुटुंबियांवर काळाचा घाला

धक्कादायक; दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
वेळापूर : उघडेवाडी (ता़ माळशिरस) येथील पोहोण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.
उघडेवाडी येथील नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे वास्तव्यास असणारे शामराव भगत हे कुटुंबासह कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन व उन्हाळा सुट्टीनिमित्त गावी वास्तव्यात आले़ दरम्यान, शुक्रवारी दुपारी हर्षद शामराव भगत (वय १२), व सिद्धार्थ शामराव भगत (वय ९ ) हे पाण्यात बुडाल्याची माहिती त्यांच्याबरोबर गेलेला पार्थ संतोष भगत याने सांगितली.
या घटनेची माहिती मिळताच मुलांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत शेततळ्यातून बाहेर काढले़ त्यानंतर उपचारासाठी वेळापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करून नंतर अकलूज येथे नेण्यात आले़ दरम्यान, त्या दोघांचाही मृत्यू झाला.