धक्कादायक; नातीच्या जन्मदिनी पोलिस मुलाचा तिसरा विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 01:00 PM2020-09-14T13:00:42+5:302020-09-14T13:04:57+5:30

मुलाचे पार्थिव पाहताच मातेचा आक्रोश; दारफळ सीना येथे पोलिसाचा अपघाती मृत्यू

Shocking; The third ritual of the grandson's birthday police boy | धक्कादायक; नातीच्या जन्मदिनी पोलिस मुलाचा तिसरा विधी

धक्कादायक; नातीच्या जन्मदिनी पोलिस मुलाचा तिसरा विधी

Next
ठळक मुद्देनेकनूर (जि़ बीड) येथे कार्यरत असताना महेश आधटराव यांची प्रशासकीय बदली गेवराई येथे झालीप्रशासकीय बदल्याबद्दल त्यांच्यासह अन्य कर्मचाºयांना फेटा बांधून, पुष्पहार घालून निरोप समारंभ पार पडलापरंतु महेश यांच्या आयुष्यात हा कार्यक्रम शेवटचाच ठरल्याची भावना पोलिसांमधून व्यक्त होत होती

अमर गायकवाड

माढा : महेश आधटराव यांच्या राजनंदिनी या मुलीचा सोमवारी वाढदिवस होता़ मोठा केक आणून साजरा करण्याचे नियोजित होते़ पण त्यांचा अपघाती मृत्यू झाला़ त्याच दिवशी तिसºयाचा कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान रविवारी पार्थिव घराजवळ येताच ‘नातीचा वाढदिवस आता कसा साजरा करायचा’ असे म्हणत महेशचे पार्थिव पाहताच मातेने आक्रोश केला़ हे दृश्य पाहून उपस्थित नातेवाईक व ग्रामस्थही गहिवरल्याचे दिसून आले.

दारफळ सीना (ता़ माढा) येथील महेश आधटराव या पोलीस कर्मचाºयाचा शनिवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले़ त्यांच्यावर मूळगावी रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने हवेत गोळीबार करून त्यांना मानवंदना देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अमूल कादबाने यांच्यासह बीड व माढ्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

नेकनूर (जि़ बीड) येथे कार्यरत असताना महेश आधटराव  यांची प्रशासकीय बदली गेवराई येथे झाली़ त्यामुळे नेकनूर पोलीस  ठाण्यात त्यांच्यासह अन्य  पोलीस कर्मचाºयांचा निरोपाचा समारंभ कार्यक्रम झाला़ त्यानंतर ते कारने (एम़ एच़ २३ एस़ एस़   ६००४) घराकडे जाताना खजाना  विहीर परिसरात कारवरील ताबा सुटला़ त्यामुळे डिव्हायडरवरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला नदीत कार कोसळली़ यामध्ये ते गंभीर जखमी झाले़ त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल जयसिंग वाघे आदींनी धाव घेतली़ त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, चुलते, चुलती असा परिवार आहे.

प्रशासकीय बदली अन् निरोप ठरला शेवटचाच
नेकनूर (जि़ बीड) येथे कार्यरत असताना महेश आधटराव यांची प्रशासकीय बदली गेवराई येथे झाली़ प्रशासकीय बदल्याबद्दल त्यांच्यासह अन्य कर्मचाºयांना फेटा बांधून, पुष्पहार घालून निरोप समारंभ पार पडला, परंतु महेश यांच्या आयुष्यात हा कार्यक्रम शेवटचाच ठरल्याची भावना पोलिसांमधून व्यक्त होत होती़ 

Web Title: Shocking; The third ritual of the grandson's birthday police boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.