शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

धक्कादायक; सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत घोळच घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:25 AM

आरोग्य खात्याचा गोंधळ कारभार; एकाच रुग्णाचा दोनदा येत आहे रिपोर्ट; नातेवाईक झाले त्रस्त..

ठळक मुद्देभवानीपेठेतील एका नगरसेवकाच्या पत्नीची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आलीअहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेसिव्हिल हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेकडून एकाच रुग्णाचे दोनदा अहवाल येत असल्याने नागरिक हैराण

सोलापूर : सोलापुरात कोरोनाने मृत्यू झालेल्या आकडेवारीतील घोळ  उघडकीस आल्यानंतर आता पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत अशा तक्रारी वाढल्या आहेत. सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेकडून एकाच रुग्णाचे दोनदा अहवाल येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

भवानीपेठेतील एका नगरसेवकाच्या पत्नीची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या रुग्णालयात उपचार घेत असताना पुन्हा चार दिवसांनी आरोग्य खात्याचे कर्मचारी घरी आले व तुमच्या घरातील दोघांंचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, उपचारास न्यावे लागेल, असे सांगू लागले. 

त्यावेळी घरातील मंडळींनी दोन्ही रुग्ण यापूर्वीच रुग्णालयात अ‍ॅडमिट असल्याचे सांगितले. यापूर्वीच अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा नवा अहवाल कोठून आला, अशी त्यांच्या घरच्यांनी विचारणा केल्यावर कर्मचारी आल्या पावली परतले आहेत. 

नातेवाईकांना मृतदेह देण्यास होतेय घाई..शाहीर वस्तीतील एका किराणा दुकानदाराचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यांना ज्या रुग्णालयात उपचारास दाखल केले होते, तेथील प्रशासनाने नातेवाईकांना मृतदेह नेण्याचा आग्रह केला. यावर एका नगरसेवकाने रिपोर्ट आला का अशी विचारणा केली, त्यावर अहवाल अद्याप आलेला नाही, असे सांगून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात न्यायचा आहे, अशी सारवासारव त्या रुग्णालयातील कर्मचाºयांनी केली. त्यावर त्या नगरसेवकाने समन्वय अधिकारी पांडे यांच्याशी संपर्क साधून अहवालाविषयी चौकशी केली. त्यानंतर त्या किराणा दुकानदाराचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.

जिल्हाधिकारी म्हणाले पाहतो..मृत्यूच्या घोळानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची यादी दुबार होत असल्याचा प्रकार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निदर्शनाला आणण्यात आला. त्यांनी या प्रकरणात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना लक्ष घालण्याची सूचना केली आहे. त्यावर शंभरकर यांनी यात नेमके काय घडले आहे हे पाहतो, असे म्हटले आहे.

कारवाई अद्याप नाहीमहापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी मृत्यूच्या नोंदीबाबत घोळ करणाºया अधिकाºयांना नोटिसा दिल्याचे सांगितले. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हा घोळ करणाºया अधिकाºयांवर कारवाई करून तत्काळ अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. तरीही अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य