धक्कादायक; ट्रॅक्टरखाली चेंगरून शाळकरी मुलगा ठार; सोलापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 14:46 IST2021-06-10T14:46:03+5:302021-06-10T14:46:10+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

धक्कादायक; ट्रॅक्टरखाली चेंगरून शाळकरी मुलगा ठार; सोलापुरातील घटना
सोलापूर - शहरातील स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामावरील ट्रॅक्टरच्या खाली चेंगरून एका शाळकरी मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास सोलापूर शहरातील दत्त चौकात घडली.
समर्थ धोंडीबा भास्कर ( वय १३, उत्तर कसबा, पंजाब तालीम, सोलापूर) असे ट्रॅक्टरखाली चेंगरून ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेतून विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. दत्त चौक परिसरातील काम सुरू असताना ट्रॅक्टरखाली चिरडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयास पाठविण्यात आले. या घटनेचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस ठाणे करीत आहे.