धक्कादायक; पंढरपुरात वाळूच्या वाहनाने दोघांना चिरडले तर अनेक जण वाचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 10:52 IST2020-12-15T08:05:59+5:302020-12-15T10:52:03+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

धक्कादायक; पंढरपुरात वाळूच्या वाहनाने दोघांना चिरडले तर अनेक जण वाचले
पंढरपूर : चंद्रभागेच्या वाळवंटातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या पिकअपने दुचाकीवरून जाणाऱ्या पती पत्नीला ६० फूट अंतरापर्यंत घसरत नेले. ही घटना मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली आहे. यामध्ये घटनास्थळीच जयश्री बारले यांचा मृत्यू झाला आहे.
६५ एकर परिसरात हे जयश्री व प्रकाश बारले हे परिसरात फिरण्यासाठी गेले होते. हे दोघे नंतर त्यांच्या दुचाकीवरून नवीन दगडी पुलावरून घराकडे जात होते. यावेळी अवैद्य वाळू वाहतूक करणारे विना नंबरचे वाहन जोराने येत होते. समोरून येणार्या पती-पत्नीच्या दुचाकीला धडक दिली व त्यांना पन्नास ते साठ फुट घसरत नेले. यामध्ये जयश्री बारले जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश बारले हे गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवीन पुलावर पहाटेच्या वेळी शुद्ध हवा घेण्यासाठी अनेक नागरिक फिरत होते. हे नागरिक या अपघातापासून बचावले आहेत.