धक्कादायक; घरफोडीच्या गुन्ह्यात नाव गुंतविण्याची धमकी दिल्यामुळे तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 19:18 IST2020-09-22T19:18:22+5:302020-09-22T19:18:27+5:30
सोलापुरातील घटना; खूनप्रकरणातील आरोपीला घेतले ताब्यात

धक्कादायक; घरफोडीच्या गुन्ह्यात नाव गुंतविण्याची धमकी दिल्यामुळे तरुणाचा खून
सोलापूर : घरफोडी केलेल्या गुन्ह्यात गुंतविण्याची धमकी दिल्यामुळे शैलेश गणपत कोकाटे (वय २८, रा. बल्लार चाळ, दमानी नगर, सोलापूर) या मित्राचा डोक्यात दगड घालून व शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला.
याप्रकरणी बबलू नरळे (वय-३०, रा. बल्लाळ चाळ, दमाणी नगर, सोलापूर) याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उमा नगरी परिसरात बबलू नरळे याने शैलेश कोकाटे यास दुचाकीवरून घेऊन गेला. तेथे दोघांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर बबलू याने शैलेशच्या डोक्यात दगड घालून आणि शस्त्राने वार केले. यात शैलेश जखमी होऊन मरण पावला. दरम्यान पोलिसांनी आरोपी बबलू यास अटक केली आहे.