शहरं
Join us  
Trending Stories
1
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
2
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
3
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
4
'त्यांचे हाथ थरथरत होते, दडपणाखाली होते'; राहुल गांधी अमित शाहांच्या लोकसभेतील भाषणावर आता काय बोलले?
5
लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!
6
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
7
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
8
व्हॉट्सअ‍ॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात! 'ही' गोष्ट करताना किमान दहा वेळ विचार कराच
9
पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...
10
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला- "माझ्या पत्नीला..."
11
धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...
12
Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
13
पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
14
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
15
व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...
16
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
17
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
18
माइंडमेश समिट २०२५: विद्या-कला-नीती पुरस्कारांची घोषणा; समाजाला आकार देणाऱ्यांचा सन्मान
19
३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; भाच्याला गळफास देऊन मामाने केला खून करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:41 IST

सोलापुरातील घटना; विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल, बालदिनाच्या आदल्या दिवशी रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळील घटना

ठळक मुद्देविठ्ठल शरणू वाघमारे (वय २४, रा. राजूर, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या मामाचे नावे मांजा आणि पतंग घेऊन देतो असे म्हणून दहा वर्षांच्या भाच्याला घेऊन गेलेल्या मामाने रस्सीने गळफास देऊन खून करण्याचा प्रयत्न केलाया प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

सोलापूर : मांजा आणि पतंग घेऊन देतो असे म्हणून दहा वर्षांच्या भाच्याला घेऊन गेलेल्या मामाने रस्सीने गळफास देऊन खून करण्याचा प्रयत्न केला. बालदिनाच्या आदल्या दिवशी रेवणसिद्धेश्वर मंदिर येथील नागोबा मंदिर येथील झुडपात हा प्रकार घडला. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

विठ्ठल शरणू वाघमारे (वय २४, रा. राजूर, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या मामाचे नावे आहे. अधिक माहिती अशी की, विठ्ठल वाघमारे हा सध्या पनवेल (मुंबई) येथे आई-वडिलांसमवेत राहण्यास आहे. तो घटनेच्या आठ दिवसांपूर्वी सोलापुरात  सोनीया नगर  विजापूर नाका झोपडपट्टी नं.२ येथील बहिणीच्या घरी आला होता. एनटीपीसी येथील ड्रायव्हरच्या नोकरीसाठी आलो असून, मला विविध कागदपत्रे द्यायची आहेत असे सांगून राहिला होता. १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३0 वाजता तो परत मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. 

जाताना भाचा विनायक गिरमल काळे (वय १0 ) हा घरात होता, त्याला चल तुला पतंग आणि मांजा घेऊन देतो असे सांगून घेऊन गेला. बराच वेळ झाल्यानंतर विनायक परत आला नसल्याचे गिरमल काळे यांच्या लक्षात आले. त्यांनी विनायकचा सर्वत्र शोध घेतला; मात्र तो कोठेही आढळून आला नाही. रात्री विठ्ठल वाघमारे याने दुसºयाच्या मोबाईलवरून गिरमल काळे यांना फोन केला. तेव्हा त्यांनी माझा मुलगा कोठे आहे? अशी विचारणा केली. विठ्ठल वाघमारेने मला माहीत नसल्याचे सांगितले. तू कुठे आहेस परत ये असे म्हंटल्यानंतर मी तिकीट काढून गाडीत बसलो आहे. मुंबईला जात आहे असे सांगितले; मात्र गिरमल काळे यांनी घरी येण्यास सांगितल्यानंतर विठ्ठल परत आला. 

विठ्ठल घरी आल्यानंतर त्याने मला काही माहीत नसल्याचे सांगितले. वडिलांनी सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा १0.३0 वाजता त्यांच्या मोबाईलवर फोन आला. तुमचा मुलगा रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ असल्याचे सांगितले. गिरमल काळे हे घटनास्थळी गेले असता तेथे विनायक जखमी अवस्थेत बसलेला आढळून आला. त्यांनी विचारणा केली असता विनायक  मामा मला येथे घेऊन आला. गळ्यात रस्सी बांधून फाशी देण्याचा प्रयत्न केला. मी बेशुद्ध पडलो होतो असे सांगितले. हा प्रकार विठ्ठल वाघमारे याने कशासाठी केला याचे कारण कळले नाही, या प्रकरणी वडील गिरमल मल्लप्पा काळे (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. 

मामा मला फाशी देऊ नको म्हणून भाच्याने केली विनंती- विठ्ठल याने विनायकला रेवणसिद्धेश्वर मंदिर येथील नागोबा मंदिराच्या जवळ नेले. विठ्ठल वाघमारे याने विनायक काळे याच्या गळ्यात रस्सी घालून गळा आवळू लागला. तेव्हा त्याने मामा मला फाशी देऊ नको म्हणून विनंती करण्यास सुरुवात केली. त्याचे न ऐकता विठ्ठल वाघमारेने जोरात गळा दाबला त्यात विनायक हा बेशुद्ध झाला. तो मरण पावल्याचे समजून तेथून निघून गेला; मात्र काही वेळानंतर त्याला जाग आली, तो तेथून उठून रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ आला. तेथे काही तरुणांनी त्याला पाहिले. विचारणा केली की तू एवढ्या रात्री येथे काय करत आहेस. तेव्हा त्याने सर्व प्रकार सांगितला, तरुणांनी त्याला वडिलांचा मोबाईल नंबर विचारून गिरमल काळे यांना फोन केला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसchildren's dayबालदिन