धक्कादायक; बार्शी तालुक्यातील कासारवाडीतील जवान विठ्ठल खांडेकर यांना वीरमरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 09:19 IST2022-04-02T09:19:29+5:302022-04-02T09:19:58+5:30

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कुटुंबियांचे सांत्वन

Shocking; Jawan Vitthal Khandekar from Kasarwadi in Barshi taluka was martyred | धक्कादायक; बार्शी तालुक्यातील कासारवाडीतील जवान विठ्ठल खांडेकर यांना वीरमरण

धक्कादायक; बार्शी तालुक्यातील कासारवाडीतील जवान विठ्ठल खांडेकर यांना वीरमरण

सोलापूर :  जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले कासारवाडी(ता बार्शी) येथील जवान विठ्ठल रामा खांडेकर यांचा जम्मू येथे सराव सुरू असताना चक्कर आल्याने वीरमरण येऊन मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कासारवाडी येथे खांडेकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

राज्य शासन खांडेकर कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार आहे. शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, पालकमंत्री श्री भरणे यांनी त्यांना आश्वस्त केले.

विठ्ठल खांडेकर हे 2004 साली CRPF मध्ये भरती झाले होते. त्यांचे  वय 40 वर्षे होते. आज सकाळी जम्मू येथे सराव सुरू असताना त्यांना चक्कर आल्याने लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. शवविच्छेदन केल्यानंतर विमानाने त्यांचे पार्थिव पुण्यात व तेथून कासारवाडी येथे येणार असल्याचे सरपंच जितेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. वडिलांना शेती नसल्याने ते मजुरी करून आपली उपजीविका भागवतात.

Web Title: Shocking; Jawan Vitthal Khandekar from Kasarwadi in Barshi taluka was martyred