Shocking; Husband sent porn video on wife's mobile via WhatsApp | धक्कादायक; पतीने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पत्नीच्या मोबाईलवर पाठविला पॉर्न व्हिडीओ

धक्कादायक; पतीने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पत्नीच्या मोबाईलवर पाठविला पॉर्न व्हिडीओ

ठळक मुद्दे- पत्नीच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अश्लील व्हिडीओ पाठविल- महावितरणच्या अधिकाºयांविरोधात सोलापुरात दाखल होता गुन्हा- नाशिक येथुन अटक करून पोलीस हजर केले सोलापूरच्या न्यायालयात

सोलापूर : पत्नीस अश्लील व्हिडीओ पाठविल्याप्रकरणी नाशिक येथील एमईसीबीच्या अधिकाºयाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अधिकाºयास शनिवारी अटक करून सोलापुरात आणण्यात आले़ रविवारी सकाळी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला न्यायाधीशांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

गुन्हा दाखल झालेली व्यक्ती ही नाशिक येथील एमईसीबीच्या कार्यालयात उच्चपदस्थ अधिकारी आहे. २0१६ साली त्याचे लग्न सोलापुरातील मुलीशी झाले होते. लग्नानंतर त्याला एक मुलगी होती. पत्नीस माहेरून पैसे आण म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत होता. या प्रकरणी पत्नीने दि. २८ जानेवारी २0२0 रोजी पतीविरूद्ध भादंवि कलम ४९८ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सध्या घटस्फोट मिळावा म्हणून कौटुंबिक न्यायालयात खटला सुरू आहे. 

न्यायालयात खटला सुरू असताना एमईसीबीच्या अधिकाºयाने दि.५ मार्च २0२0 रोजी पत्नीच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अश्लील व्हिडीओ पाठविले होते. हा प्रकार विक्षिप्त वाटल्याने त्यांनी दि.६ मार्च रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हवालदार हिंदुराव पौळ व अन्य कर्मचाºयांनी एमईसीबीच्या अधिकाºयाला नाशिक येथून अटक केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करीत आहेत. 

Web Title: Shocking; Husband sent porn video on wife's mobile via WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.