धक्कादायक; पैशाच्या कारणावरून पतीने ओतले पत्नीच्या अंगावर पेट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 02:40 PM2020-09-14T14:40:49+5:302020-09-14T14:40:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क

Shocking; The husband poured petrol on his wife for money | धक्कादायक; पैशाच्या कारणावरून पतीने ओतले पत्नीच्या अंगावर पेट्रोल

धक्कादायक; पैशाच्या कारणावरून पतीने ओतले पत्नीच्या अंगावर पेट्रोल

Next

सोलापूर : माहेरून पैसे न आणल्याच्या कारणावरून व पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दिल्याचा राग मनात धरून पती गणेश दिलीप जाधव व अन्य दोघांनी पत्नी नेहा गणेश जाधव (वय २५) हिच्या अंगावर मोदी येथील बोगद्याजवळ पेट्रोल ओतले. 

हा प्रकार रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. नेहा जाधव ही पतीबरोबर वाद झाल्यामुळे माहेरी राहते. रविवारी सकाळी भाजीपाला आणण्यासाठी जात होती तेव्हा मोदी बोगद्याजवळ गणेश जाधव याने पेट्रोल टाकले. नेहा जाधव हिने आरडाओरड करताच तिघेजण तेथून पळून गेले. त्रास होऊ लागल्याने नेहा जाधव हिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Shocking; The husband poured petrol on his wife for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.