धक्कादायक; पैशाच्या कारणावरून पतीने ओतले पत्नीच्या अंगावर पेट्रोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 14:40 IST2020-09-14T14:40:49+5:302020-09-14T14:40:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क

धक्कादायक; पैशाच्या कारणावरून पतीने ओतले पत्नीच्या अंगावर पेट्रोल
सोलापूर : माहेरून पैसे न आणल्याच्या कारणावरून व पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दिल्याचा राग मनात धरून पती गणेश दिलीप जाधव व अन्य दोघांनी पत्नी नेहा गणेश जाधव (वय २५) हिच्या अंगावर मोदी येथील बोगद्याजवळ पेट्रोल ओतले.
हा प्रकार रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. नेहा जाधव ही पतीबरोबर वाद झाल्यामुळे माहेरी राहते. रविवारी सकाळी भाजीपाला आणण्यासाठी जात होती तेव्हा मोदी बोगद्याजवळ गणेश जाधव याने पेट्रोल टाकले. नेहा जाधव हिने आरडाओरड करताच तिघेजण तेथून पळून गेले. त्रास होऊ लागल्याने नेहा जाधव हिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.