धक्कादायक; होटगीत मायलेकीची आत्महत्या; विहिरीत उडी मारून जीवन संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 09:23 IST2021-07-08T09:18:26+5:302021-07-08T09:23:53+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Shocking; Hotgeet Mileki's suicide; He ended his life by jumping into a well | धक्कादायक; होटगीत मायलेकीची आत्महत्या; विहिरीत उडी मारून जीवन संपविले

धक्कादायक; होटगीत मायलेकीची आत्महत्या; विहिरीत उडी मारून जीवन संपविले

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी गावात शेतातील विहिरीत पडून मायलेकींनी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. 

राचम्मा संतोष पटणे (वय २६ ) व मुलगी चैत्रा पटणे (वय ६) असे आत्महत्या केलेल्या दोघींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघींचे मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आले. याबाबत वळसंग पोलिसांनी माहिती देण्यात आली. त्यानंतर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह लोकांच्या मदतीने बाहेर काढून रुग्ण वाहिकेतून उपचारासाठी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्या दोघींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Shocking; Hotgeet Mileki's suicide; He ended his life by jumping into a well