धक्कादायक; दहा रुपयाच्या माव्यासाठी मित्राने केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 14:42 IST2020-10-30T14:39:30+5:302020-10-30T14:42:24+5:30

सोलापुरातील घटना; पोलिसांचा तपास सुरु

Shocking; A friend killed a friend for ten rupees | धक्कादायक; दहा रुपयाच्या माव्यासाठी मित्राने केला मित्राचा खून

धक्कादायक; दहा रुपयाच्या माव्यासाठी मित्राने केला मित्राचा खून

ठळक मुद्देआरोपी शकील आणि मुर्तूज या दोघांचे घरे शंभर मीटरच्या अंतरावर आहेतमृताचे नातेवाईकांनी त्याच्या घराजवळ गर्दी केली होतीमुर्तुज शेख (वय ३३, रा. हुसेन नगर) असे मयत इसमाचे नाव आहे.

सोलापूर : दहा रुपयाच्या मावापोटी दोन मित्रांमध्ये किरकोळ भांडण झाले़ या भांडणाचे रुपांतर मारामारीमध्ये झाले, यातच एका मित्राने दुसºया मित्राला ठोसा मारल्यामुळे दुसºया मित्राचा जागीच मृत्यू झाला. मुर्तुज शेख (वय ३३, रा. हुसेन नगर) असे मयत इसमाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गुरुनानक चौकाजवळील शानदार चौकात मयत मुर्तुज शेख व संशयित आरोपी शकील शेख हे दोघे क्रीडा संकुलाच्या गाळ्या समोर बसले होते. तेव्हा चेष्टा मस्करी मध्ये मावा खाण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. यावेळी तेथील उपस्थितांनी ही वादावादी मिटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोघांमध्ये धुमशान मारामारी झाली. यात जोराने मार लागल्यामुळे मुर्तुज हा तेथेच जागी कोसळला. त्याला उपस्थितांनी लगेच शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच येऊन परिसराची पाहणी केली. सोबतच तेथे असलेल्या सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झाली आहे का याचा तपास करत आहेत. यावेळी एसीपी प्रीती टिपरे, सदर बाजार चे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे घटनास्थळी दाखल होते.

------------
सकाळीच दोघांनी केले एकत्र काम केले
या घटनेतील मयत मुर्तुज व संशयित आरोपी शकील हे दोघे आचारी आहेत. हे दोघे गेल्या आठ ते दहा वषार्पासून विविध कार्यक्रमाचे आॅर्डर घेऊन तेथील जेवण बनवण्याचे काम करतात. त्या दोघांनी गुरुवारी सकाळी ही एक आॅर्डर घेऊन तेथील जेवण तयार करून दिले होते. सायंकाळच्या सुमारास दोघांनीही सिंधी सदृष्य रसायन पिल्यामुळे एकमेकांत वाद झाल्याची माहिती तेथील उपस्थितांनी दिली. दरम्यान, मुर्तुज च्या पश्चात दोन मुले व पत्नी आहे.

-----------
शंभर मीटरच्या आतच दोघांची घरे
आरोपी शकील आणि मुर्तूज या दोघांचे घरे शंभर मीटरच्या अंतरावर आहेत. दरम्यान मुर्तुज मरण पावला असल्याची माहिती कळताच मृताचे नातेवाईकांनी त्याच्या घराजवळ गर्दी केली होती.

Web Title: Shocking; A friend killed a friend for ten rupees