धक्कादायक; भिंत अंगावर पडल्याने चार वर्षाच्या चिमुरडयाचा मृत्यू; वाढदिवसादिवशी घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 17:46 IST2020-11-05T17:46:26+5:302020-11-05T17:46:30+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

धक्कादायक; भिंत अंगावर पडल्याने चार वर्षाच्या चिमुरडयाचा मृत्यू; वाढदिवसादिवशी घडली घटना
पंढरपूर : वाढदिवसादिवशी चार वर्षाच्या चिमुरड्याचा अंगावर भिंत कोसळली. यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना श्री विठ्ठल मंदिर परिसरातील तांबेकर गल्ली येथे चार च्या सुमारास घडली आहे. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव श्लोक रवींद्र घन ( वय ५, रा. तांबेकर गल्ली, पंढरपूर) असे नाव आहे. ही घटना गुरुवारी चारच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमा होरणे यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे जुन्या वाड्याची भिंती पाडण्याचे काम सुरू होते. भिंतीचा काही भाग वाड्यासमोरून जात असलेल्या श्लोक रवींद्र घन ( वय ५, रा. तांबेकर गल्ली, पंढरपूर) याच्या आंगावर पडली. जागीच त्याचा हात तुटून बाजूला पडला. त्याला उप जिल्हा रुग्णालयात नेहले, असता व त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.