धक्कादायक; आधी लिंक आली.. दोनशे रुपये भरले; नंतर खात्यातून पावणेदोन लाख गेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 12:17 IST2021-08-12T12:16:54+5:302021-08-12T12:17:02+5:30

सोलापूर : तरुणाचा विश्वास संपादन करून त्याला एक लिंक देऊन त्यात दोनशे रुपये भरण्यास सांगितले नंतर, बँक खात्यातून एक ...

Shocking; First the link came .. Two hundred rupees paid; Then 52 lakhs went out of the account! | धक्कादायक; आधी लिंक आली.. दोनशे रुपये भरले; नंतर खात्यातून पावणेदोन लाख गेले !

धक्कादायक; आधी लिंक आली.. दोनशे रुपये भरले; नंतर खात्यातून पावणेदोन लाख गेले !

सोलापूर : तरुणाचा विश्वास संपादन करून त्याला एक लिंक देऊन त्यात दोनशे रुपये भरण्यास सांगितले नंतर, बँक खात्यातून एक लाख ७५ हजार रुपये काढून घेतल्याची फिर्याद अक्षय विजय मोळावडे (वय २५, रा. कृष्णाई निवास, अभिनव मित्र मंडळ, मुंबई, सध्या लोकमंगल ऑक्सीपार्क, उमानगरी जवळ) यांनी बुधवारी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अक्षय यांना ॲमॅन्डा ॲनालया अशा नावाने फोन आला. त्या व्यक्तीने एक लिंक पाठवून अक्षय यांचा विश्वास संपादन करून घेतला. त्यानंतर त्या लिंकवरून २०० रुपये भरून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातील १ लाख ७५ हजार चारशे रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. अशा आशयाची फिर्याद अक्षय मोळावडे याने दिली असून त्याच्या फिर्यादीवरून मोबाइलधारकावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास मोरे हे करत आहेत.

Web Title: Shocking; First the link came .. Two hundred rupees paid; Then 52 lakhs went out of the account!