शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; कोरोनाची लक्षणे असतानाही उपचारास न नेल्याने पत्नीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 10:27 IST

मंगळवेढा तालुक्यातील घटना; सासूच्या तक्रारीवरून पतीविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा : कोरोना रोगाची लक्षणे दिसत असतानाही पतीने तीला वेळेत उपचारास दाखल न करता तीला क्रूर वागणूक देवून छळ केल्याप्रकरणी सासूच्या फिर्यादीवरून जावई लिंगराज दामू पवार (रा. साईनिवास तुकाईनगर, मंगळवेढा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी उमा शंकर चव्हाण(वय 69 रा. नेहरू नगर सोलापूर) यांची मुलगी तथा मयत अश्‍विनी हिचा विवाह 14 मे 2005 रोजी आरोपी लिंगराज दामू पवार याच्याबरोबर झाला होता. जावई लिंगराज हे आरोग्य खात्यात नोकरीस होते.  मयतास 24 फेब्रुवारी 2006 रोजी मुलगी झाली होती. मुलगी झाल्याच्या कारणावरून जावई लिंगराज हे नाराज असल्याने वारंवार मयतास उपाशी ठेवून मुलगा होण्यासाठी  त्रास देवून मी दुसरे लग्न करणार आहे,तु घटस्फोट दे नाही तर तुला खलास करून टाकीन अशी दमदाटी करत असे. तदनंतर मंगळवेढयातील प्रतिष्ठित लोकांकडून आरोपीस समज देण्यात आली होती. त्यामुळे काही दिवस  व्यवस्थित नांदवले. दि.15 एप्रिल 2021 रोजी मयत अश्‍विनी हिस श्‍वास घेता येत नव्हता, तीच्या रक्ताच्या उलटया झाल्या,तीला उपचारास घेवून जावा असे फिर्यादीने पाया पडून सांगितले तरीसुध्दा उपचारास नेले नाही.

दि.22 एप्रिल रोजी मयत अश्‍विनी हिस बेळगाव येथील के.एल.ई. हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र दि. 29 रोजी संध्याकाळी 8.40 च्या दरम्यान ती मयत झाली. त्यानंतर फिर्यादीचे  जावई  तथा आरोपी लिंगराज दामू पवार याने मंगळवेढयात येवून अश्‍विनीच्या दवाखान्याची कागदपत्रे जाळून टाकली. व नात श्रध्दा हिस कोणास काही एक सांगू नको म्हणून दमदाटी केली. तसेच तुम्ही कोठे तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली.

मयत अश्‍विनी हिस कोरोना रोगाची लक्षणे दिसत असतानाही तीला वेळेत उपचारार्थ दाखल न केल्यानी ती मयत झाली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास शहर बीटचे पोलिस करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू