धक्कादायक; मंद्रुपच्या निवृत्त कृषी अधिकाºयाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:21 IST2020-06-19T16:19:58+5:302020-06-19T16:21:42+5:30

गेल्या चार दिवसांपासून सुरू होते खाजगी रुग्णालयात उपचार

Shocking; Corona kills retired agricultural officer of Mandrup | धक्कादायक; मंद्रुपच्या निवृत्त कृषी अधिकाºयाचा कोरोनाने मृत्यू

धक्कादायक; मंद्रुपच्या निवृत्त कृषी अधिकाºयाचा कोरोनाने मृत्यू

ठळक मुद्देउपचार सुरू असताना शुक्रवारी ते मरण पावल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आलेते मूळचे मंद्रुपचे असले तरी सोलापुरातील वैष्णवी नगरात राहावयास होतेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने या घराची तपासणी करून निजंर्तुकीकरण केले

सोलापूर : येथील वैष्णवी नगरात राहणारे व मूळचे मंद्रुप येथील सेवानिवृत्त कृषी अधिकाºयाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. चार दिवसापूर्वी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यापूर्वी त्यांच्यावर हृदयरोगासंबंथी उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यातून ते बरे होऊन घरी परतल्यानंतर त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल झाले होते.

उपचार सुरू असताना शुक्रवारी ते मरण पावल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. ते मूळचे मंद्रुपचे असले तरी सोलापुरातील वैष्णवी नगरात राहावयास होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या घराची तपासणी करून  निजंर्तुकीकरण केले व त्यांच्या संपर्कातील घरातील मंडळींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. कृषी केंद्राच्या माध्यमातून त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.

Web Title: Shocking; Corona kills retired agricultural officer of Mandrup