Shocking; A boy who was coming to Solapur with his father died in an accident | धक्कादायक; वडिलांना घेऊन सोलापूरकडे येणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू

धक्कादायक; वडिलांना घेऊन सोलापूरकडे येणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू

सोलापूर : कासेगावहून सोलापूरकडे वडिलांना घेऊन येत असताना जुना तुळजापूर नाका येथील पर्ल गार्डन येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मुलगा दिनेश हणमंत जाधव (वय २५, रा. कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर) हा ठार झाला. हा अपघात मंगळवारी ५.३० वाजता घडला.

दिनेश जाधव व त्यांचे वडील हणमंत शामराव जाधव (वय ५५) हे दोघे मोटारसायकल (क्र. एमएच-१३ बीए-८७४७) वर बसून येत होते. दोघे जुना तुळजापूर नाका येथील पर्ल गार्डन येथे आले असता अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. धडकेत दिनेश जाधव हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता मृत्यू झाला. याची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Shocking; A boy who was coming to Solapur with his father died in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.